ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

‘आरे’च्या सर्व स्टॉल्सचे सर्वेक्षण करा – दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनिल केदार

मुंबई,: मुंबईत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्यासाठी आरे स्टॉल्सचे वितरण करण्यात आले होते. काही स्टॉल्सवर सध्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री न होता इतर उपयोगासाठी स्टॉल्स वापरल्याचे निदर्शनास येत असल्याने सर्व स्टॉल्सचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनिल केदार यांनी दिले.

मंत्रालय येथे आरे स्टॉल्सचा आढावा घेण्यासंदर्भात बैठक झाली. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त एच. पी. तुम्मोड उपस्थित होते.

पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनिल केदार यांनी मुंबईत आरे स्टॉल्सवरून सद्यस्थितीत आरे उत्पादनाची होणारी स्टॉलनिहाय एकूण विक्री, दुग्धजन्य पदार्थ सोडून इतर पदार्थांची विक्री व त्याबाबतची माहिती, एकूण आरे स्टॉलची संख्या,सध्या प्रत्यक्ष चालवित असणारे व अवैधरित्या हस्तांतर करून चालविणाऱ्या आरे स्टॉल्सची संख्या अशी माहिती मिळवण्यासाठी तात्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले.

error: Content is protected !!