ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

सुरतच्या महापालिकेत आम आदमी पक्षाने मारलेली मुसंडी देशात चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबई : गुजरातच्या सहा महापालिका निवडणुकीत भाजपने अतिशय दमदार कामगिरी केलीय. पण भाजपच्या कामगिरी इतकंच आम आदमी पक्षानेही कष्ट घेतलं आहे आणि त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं आहे. सुरत महापालिकेत आम आदमी पक्षाने 27 जागा जिंकल्या आहेत, तिथे काँग्रेसला मात्र भोपळाही फोडता आलेला नाही. सुरतच्या महापालिकेत आम आदमी पक्षाने मारलेली मुसंडी देशात चर्चेचा विषय ठरत आहे.
आम आदमी पक्षाची गुजरातच्या राजकारणात एन्ट्री
सुरत महापालिकेच्या निवडणुकीत एकूण 120 जागांपैकी भाजपचे 93 तर आम आदमी पक्षाचे 27 नगरसेवक निवडून आले आहेत. दुसरीकडे काँग्रेसला मात्र एकही जागा जिंकता आली नाही. सुरतच्या महापालिका निवडणुकीत आपने एन्ट्री करुन आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

आम आदमी पक्षाला का यश मिळालं?
पहिल्याच प्रयत्नात आम आदमी पक्षाला सुरतच्या महापालिकेत जोरदार यश मिळालं. आपचे पार्टी प्रदेश अध्यक्ष गोपाल इटालिया जे स्वत: सुरतचे रहिवासी आहेत त्यांनी निवडणुकीचा प्रचार अतिषय उच्चम केला होता. तसंच ते पाटीदार समाजाचे आहेत. आपला मिळालेल्या बहुसंख्य जागांपैकी पाटीदार समाजाची मतं बहुमुल्य ठरली आहेत. तसंच त्याच मतांच्या जोरावर बहुसंख्य जागांवर आप उमेदवारांचा विजय झालेला आहे.

सूरतच्या महापालिकेत काँग्रेस शून्य
भाजप आणि आपने सूरतच्या महापालिकेत दमदार कामगिरी केलीय परंतु काँग्रेसला मात्र एकही जागा जिंकता आली नाही. पाटीदार समाजाची काँग्रेसवर असलेली नाराजी, असं यापाठीमागचं मुख्य कारण असल्याची चर्चा आहे.

आपची पहिल्यांदा महाराष्ट्रात एन्ट्री, आता गुजरातमध्ये…
प्रथमत: महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपने एन्ट्री केली आणि आता गुजरातच्या महापालिका निवडणुकीत… दिवसेंदिवस हळुहळु का होईना परंतु आपचा विस्तार देशभरात होतोय. दिल्लीतील लोकप्रिय असलेलं केजरीवाल सरकारच्या प्रतिमेमुळे मतदारांची पसंती आपला मिळते आहे.

पुढच्या दीड वर्षात गुजरात निवडणुका
आपसाठी सूरत महापालिकेतला विजय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण पुढच्या दीड वर्षात गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. महापालिका निवडणुकीत यशस्वी एन्ट्री केल्यानंतर तसंच गुजरातमध्ये काँग्रेसची पिछेहाट झाल्यानंतर आपसाठी ही मोठी संधी असणार आहे.

error: Content is protected !!