ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

37 लाखाची गोव्याची विदेशी दारु जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

37 लाखाची गोव्याची विदेशी दारु जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

बीड :-
24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने
बीड तालुक्यातील कुमशी शिवार येथून एक संशयित कंटेनर उभा असल्याचे आढळून आल्याने त्याची झडती घेतली असता त्यात गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असणा-या विदेशी मद्याच्या 550 पेट्यांचा साठा आढळून आला. ज्यात रियल सेव्हन व्हिस्की ब्रॅंडच्या 750 मिली क्षमतेचे 150 बॉक्स, इंपेरियल ब्ल्यु व्हिस्की ब्रॅंडच्या 180 मिली क्षमतेचे 60 बॉक्स , रॉयल स्टॅग व्हिस्की ब्रॅंडच्या 180 मिली क्षमतेचे 20 बॉक्स, मॅकडॉवेल नंबर 1 व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेचे 320 बॉक्स अशा विदेशी दारुचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातील दराप्रमाणे जप्त केलेल्या दारुची एकूण किंमत रुपये 36 लाख 72 हजार 600 इतकी आहे. तसेच जप्त कंटेनरची किंमत अंदाजे 12 लाख इतकी आहे. कंटेनरच्या चालक विष्णू भागवत कांबिलकर , वय 32 वर्ष, रा. मनकुरवाडी, ता. जि. बीड असे असून त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 च्या कलम 65 (अ)(ई), 83 व 108 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई श्री कांतीलाल उमाप व औरंगाबाद विभागाचे विभागीय उप-आयुक्त श्री प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खात्रीलायक बातमीनुसार अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड नितिन धार्मिक यांचे नेतृत्वाखाली निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड श्री डि.एल.दिंडकर, दुय्यम निरिक्षक श्री एस.बी.शेळके, श्री ए.जे. राठोड, श्री ए.आर.गायकवाड, श्री ए.एस. नैबळ, जवान सचिन सांगुळे, अमीन सय्यद, नितिन मोरे, प्रशांत मस्के, आर.एम.गोणारे, वाहनचालक शेळके यांनी सदर कारवाई केली.
आवाहन
नागरिकांनी त्यांच्या परिसरात अवैध व बनावट मद्याची विक्री होत असल्यास त्याबाबतची माहिती या विभागाला द्यावी, माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येऊन अशा अवैध दारु विक्रेत्यांवर ठोस कारवाई केली जाईल, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड यांनी केले आहे.

error: Content is protected !!