ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

कल्याण भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेच्या माध्यमातून चिंतन दिन उत्साहात साजरा

कल्याण :प्रतिनिधी 
जागतिक स्काऊट गाईड चळवळीचे जनक लाॅर्ड बेडेन पाॅवेल यांचा जन्मदिवस, २२ फेब्रुवारी म्हणजेच जागतिक चिंतन दिवस स्थानिक संस्थेच्या माध्यमातून शारदा मंदिर हायस्कूल,कल्याण पश्चिम येथे संपन्न झाला. शाळा बंद असल्यामुळे संस्थेच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्काऊटर व गाईडर यांच्यासाठी अभिनय,नृत्य,कथाकथन आणि काव्यवाचन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. लाॅर्ड बेडेन पाॅवेल व लेडी पाॅवेल यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रार्थना गायनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा संघटक सौ संगीता रामटेके मॅडम,जिल्हा सहायक आयुक्त श्रीम.सुष्मा चौधरी मॅडम,  उपाध्यक्ष श्री बी एन भोसले सर, सहसचिव निवेदिता कोरान्ने मॅडम, विश्वास विद्यालयाचे मुख्याध्यापिका ज्योती पाटील मॅडम,शारदा मंदिर  प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री पटवर्धन सर आणि स्पर्धा परीक्षक म्हणून सौ.पाठक मॅडम उपस्थित होते. चिंतन दिनाचे प्रास्ताविक करताना सचिव श्री दिलीप  तडवी यांनी चिंतनदिनाचे महत्व विषद केले त्याचबरोबर कोरोनाच्या काळात संस्थेने केलेल्या उपक्रमांची माहिती दिली.शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या अभिनय व नृत्य स्पर्धा आॅनलाईन आयोजित केल्या होत्या तर काव्यवाचन व कथाकथन स्पर्धा प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी संपन्न झाल्या.परीक्षक म्हणून सौ पाठक मॅडम यांनी  काम पाहिले. विजेत्यांना संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी ३० स्काऊटर व गाईडर उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा संघटक सौ संगीता रामटेके मॅडम यांनी संस्थेच्या उपक्रमांविषयी कौतुक केले तसेच सर्वांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन श्री पटवर्धन सर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ अपर्णा हर्षे यांनी छानप्रकारे केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रविण खाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ.निवेदिता कोरान्ने यांनी मानले. याप्रसंगी सौ.गुप्ते , श्री दशरथ आगवणे, श्री अविनाश नलावडे, सौ.वाबळे, सौ.अनिता पाटील, सौ.बिना शुक्ला, श्री संजय मुसळे, श्री सुरेश गभाले, सौ.निता जाधव,सौ.विजेता रहाटे, प्रिती बोरकर,सौ.रेखा मागाडे,श्री सुभाष सरोदे,सौ.कडू , श्री कैलास सरोदे हे उपस्थित होते.करोनोचे सर्व नियम पाळून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले..कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व स्काऊटर व गाईडर यांनी मेहनत घेतली.

error: Content is protected !!