ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शिवचरित्रातील विचार महत्वाचे-ह.भ.प. प्रा.नाना महाराज कदम.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शिवचरित्रातील विचार महत्वाचे-ह.भ.प. प्रा.नाना महाराज कदम.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️बीड | प्रतिनिधी.
दि. २४ छत्रपतींच्या स्वराज्यातील शेतकऱ्यासंबंधी धोरण, विचार आणि निर्णय हे आजच्या काळातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत असे प्रतिपादन प्राध्यापक नाना महाराज कदम यांनी केले ते बीड तालुक्यातील पोखरी येथे आयोजित शिवजयंतीनिमित्त कीर्तन महोत्सवात पहिले किर्तन पुष्प गुंफताना बोलत होते यावेळी प्रमुख उपस्थिती बेलेश्वर संस्थान चे संत तुकाराम महाराज शास्त्री श्री.ह.भ.प. सुरेश महाराज जाधव श्री.ह.भ.प. अभिमान महाराज ढाकणे ओमकार महाराज कागदे, श्री ह.भ.प.अनिल महाराज कासकर श्री ह भ प योगेश महाराज जोगदंड उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंतीनिमित्त पोखरी गावात विधायक उपक्रम घेत शिवजयंती उत्सव सुरू आहे या उत्सवात सामाजिक प्रबोधन पर कीर्तन व छत्रपतींच्या इतिहासातील विचार आजच्या जीवनाला कसे समर्पक आहेत यासंदर्भात मार्गदर्शनपर व्याख्याने ठेवण्यात आली होती यात पहिल्या दिवशी चे किर्तन पुष्प गुंफताना श्री ह भ प प्राध्यापक नाना महाराज कदम यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या
धर्माचे पालन ! करणे पाखंड खंडन!! हेचि आम्हा करणे काम !बीज वाढवावे नाम ! देतो तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाणफिरे!!
नाही भीड भार! तुका म्हणे साना थोर या अभंगावर सुंदर चित्र मांडले यावेळी बोलताना ते म्हणाले की
समाजच हित व्हाय यासाठी संत अवतीर्ण होतात.. महापुरुषाचा अवतार कार्य समाजाचा उद्धार करण्यासाठी असतात त्याचबरोबर दीनदलित दुबळ्या लोकांना त्यांचे हक्क देऊन जगण्याचं खरं मूल्य दाखवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करत असतात

परोपकार करण्यासाठी पृथ्वीतलावर नदी वृक्ष गाय संत महापुरुष येत असतात त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील महाराष्ट्राच्या मातीतील रंजल्या-गांजल्या दीनदलित दुबळ्या लोकांच्या सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले या स्वराज्यांमध्ये सर्व रयत सुखाने नांदत होती यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही विचार केला त्यामुळे छत्रपतिच्या स्वराज्यात एकही शेतकरी आत्महत्या केली असं कुठेही सापडत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचा संबंधी केलेले काम धोरण निर्णय आणि विचार आजच्या काळात उपयुक्त आहेत त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकऱ्यांच्या जीवन सुखकर करण्यासाठी छत्रपतींच्या इतिहासातील विचार राज्यकर्त्यांनी अमलात आणावेत असे प्राध्यापक नाना महाराज कदम म्हणाले.

सोळाव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतकरी व समाजाचा संबंधी विचार धोरण आजही तुमच्या तितकेच उपयुक्त आहेत छ्त्रपती च्या कार्य कर्तृत्वाचा सुगधं आज ही दरवेळतो स्वतःला त्रास झाला तरी समाजाचा उद्धार व्हावा अस विचार करणारे महापुरुष आणि संत असतात छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान दिला.. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना गरीब विद्यार्थी त्याला शिक्षणासाठी मदत केली तर हीच खरी शिवजयंती ठरेल असा विचार देखील नाना महाराज यांनी मांडला या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन सुदर्शन दळवे ,निखिल खिल्लारे प्रवीण मुळीक अभिजित फाळके या गावातील तरुणांनी केले होते कोरोना चे नियम पाळून कीर्तनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

error: Content is protected !!