ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

‘एवायएम जेपीएल हाफपिच क्रिकेट’ स्पर्धेतील खेळाडूंची संघनिहाय निवड

इचलकरंजी/प्रतिनिधी –
क्रिकेट रसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेल्या आचार्यश्री आनंद युवा मंच आयोजित ‘एवायएम जेपीएल हाफपिच क्रिकेट’ स्पर्धेतील खेळाडूंची संघनिहाय निवड करण्यात आली आहे. ही मार्च मार्च महिन्यात होत असून नामवंत उद्योजक लूणचंदजी अशोककुमार सालेचा यांचा ‘उपकार ग्रुप’ या स्पर्धेचा मुख्य प्रायोजक आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघांचा सहभाग असणार आहे.
दरम्यान, 4 मार्चपासून सुरु होणारी स्पर्धा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या विनंतीनुसार स्थगित ठेवण्यात आली आहे. स्पर्धेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
आचार्यश्री आनंद युवा मंच यांच्यावतीने गत पाच वर्षापासून ‘एवायएम जेपीएल हाफपिच क्रिकेट स्पर्धा’ आयोजित केली जात आहे. यंदा कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा वेळाने होत आहे. नामदेव भवन मैदानावर होणार्‍या या स्पर्धेसाठी खेळाडूंची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. त्यानुसार नोंदणीकृत खेळाडूंची लिलाव पध्दतीने संघनिहाय निवड करुन 144 खेळाडूंचा सहभाग असलेल्या 12 संघांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये दबंग एमटीटी (गौतम व चंपालाल वडेरा), गध सिवाना वॉरिअर्स (कमलेश चोरडीया, कमलेश कनुगा व नरेश बागरेचा), पेरीटस रायडर्स (नुतन मुथा), प्रसन्ना बॉईज (पंकज कासलीवाल), एम. के. वॉरिअर्स (मुकेश वडेरा व कपिल वडेरा), लाईफ इन्शुरन्स वॉरिअर्स (मनिष मुनोत), एचव्ही स्मॅशर्स (हेमंत बागरेचा व विवेक कोठारी), एसबी टायटन्स (दिनेश सालेचा व राजू बाफना), अण्णा बॉईज (महेंद्र छाजेड व महावीर भंडारी), एमएस स्टार (सुनिल कोठारी), युनिटी स्पोर्टस् (पद्म ओसवाल व राहुल बोरा) आणि फे्रण्डस फॉरएव्हर (रोहित आँचलिया व निर्मल संकलेचा) या संघांचा समावेश आहे. स्पर्धेसाठी भरत-अखिल-निखिल बोहरा ‘भरत बोहरा कॉर्प’ हे सहप्रायोजक असून या वर्षी सहआयोजक म्हणुन जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑरगनाईजेसेशन (जीतो) यांचा सहभाग असणार आहे. खेळाडूंच्या निवडीसाठी बडोदा येथून मित लुकड यांचे कडून खास अ‍ॅप्लिकेशन तयार करुन घेण्यात आले होते ते येथे उपस्थित होते. त्याद्वारे ही प्रक्रिया पार पडली.
सर्वच संघांतील खेळाडूंची निवड मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आली. त्याची सुरुवात मुख्य प्रायोजक लुणचंद सालेचा, अशोक सालेचा यांच्या हस्ते आणि भारत बोहरा, दिलीप मुथा , प्रकाश बोरा ,जीवन पुनमिया यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. स्वागत राजेंद्र बोरा, मयुर पिपाडा, करण मुथा, निलेश बोरा, सुदीन चोपडा, साहिल बोरा, प्रफुल्ल बोरा, रुपेश चोपडा, सुमतीलाल शहा यांनी केले. प्रास्ताविक प्रितम बोरा यांनी केले. तर आभार सुमित मुनोत यांनी मानले. सर्व टीम ओनर्सचे स्वागत, नाश्ता यांची व्यवस्था योगेश भलगट, स्वप्निल बोरा, राकेश बंब, प्रितेश बोरा यांनी पहिली. यावेळी मंडळ चे सर्व सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!