ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयाने लेखी सुचना काढली , नियम मोडणारांवर दंडात्मक कारवाई होणार:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

______________________________ लिंबागणेश येथिल आज गुरूवार रोजी आठवडे बाजारातील वस्तुस्थिती पाहता विक्रेते-ग्राहक यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्या कोरोना संदर्भात नियमावलीचे मास्क न लावणे काटेकोरपणे पालन करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय लिंबागणेश सरपंच, उपसरपंच, व ग्रामसेवक यांच्या सहमतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याच्या लेखी सुचना दिल्या आहेत.

सविस्तर माहीतीस्तव:-
_____________________________
ग्रामपंचायत कार्यालय लिंबागणेश, ग्रामसेवक मुसळे सोपान यांच्या लेखी सूचनेनुसार लिंबागणेश ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक ठीकाणी व रस्त्यावर मास्कचा वापर करण्यात यावा अन्यथा पहिल्या वेळेस 500 रू दंडात्मक कारवाई व परत तीच व्यक्ती मास्क न वापरता आढळल्यास 1000 रू दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल, त्याचे नाव ग्रामपंचायतच्या दर्शनी भागात लावण्यात येईल. सार्वजनिक ठीकाणी जमावबंदी करण्यात येऊन हाॅटेल, दुकानात मास्क व सॅनिटायझर वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे, किराणा दुकान, राशन दुकान, याठीकाणी वर्तुळ आखून साहीत्य देण्यात यावे, आठवडी बाजारात येताना मास्क न आठळल्यास 500 रूपये दंड आकारण्यात येईल, आदि मार्गदर्शक सुचना जिल्हाधिकारी बीड यांच्या आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 ,साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897,फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, बीड जिल्हाधिकारी यांचे आदेश क्रमांक 144 दि.24 फेब्रुवारी 2019 नुसार नियमाचे पालन करण्यात यावे असे लेखी सुचना सरपंच, उपसरपंच यांच्या सहमतीने ग्रामविकास आधिकारी यांनी काढले आहेत

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.8180927572

error: Content is protected !!