ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

मुख्यमंत्री साहेब मराठा आंदोलकांची घोर फसवणूक थांबवा… साष्टपिंपळगाव आंदोलक

मुख्यमंत्री साहेब मराठा आंदोलकांची घोर फसवणूक थांबवा… साष्टपिंपळगाव आंदोलक
====================
राज्य मंत्रीमंडळातील आपले सहकारी मंत्रीगण मराठा आंदोलकांची करताहेत घोर चेष्टा, परंतु याचे परिणाम वाईट असतील असा तीव्र संताप मनोज जरांगे पाटिल यांनी व्यक्त केला
“””””””””””””””””””

साष्टपिंपळगाव :-
राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाचा आजचा ३७ वा दिवस आहे, शेतकरी, कष्टकरी मराठी जनता या गावात जास्त असून सुद्धा आपल्या मराठा मुलाबाळांच्या भविष्याच्या आरक्षण प्रश्नासाठी गावकर्‍यांनी एकजुटीची मशाल तेवतच ठेवली आहे.


अख्खे गावच ३७ दिवस मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून बसून राहणे साधीसोपी गोष्ट नाही, थोडेसे या गावकर्‍यांच्या जिद्दीला हात घालून पहा आपण सुध्दा यांच्या निर्धाराला सलाम कराल, या आंदोलकांची सरळ सरळ व्याख्या आहे मराठा समाजाला आरक्षण द्या परंतु आरक्षण विषय निघाला की सरकार तिळपापड झाल्यासारखे काडू मडू तोंड करून बसत आहे आणि यामुळेच सरकारबद्दल कोट्यावधी मराठा समाजात गैरसमज पसरत आहे.

साष्टपिंपळगाव आंदोलकांची प्रामाणिकपणे भावना व्यक्त करीत आहे की जर आज मा. उध्दवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असते तर सकल मराठा समाजाला आणि साष्टपिंपळगाव आंदोलकांना हे राज्यव्यापी आंदोलन उभे करावेच लागले नसते आणि जर आंदोलन उभे राहिले असते तर मा. उध्दव साहेब ठाकरे मातोश्री बंगला सोडून तातडीने आंदोलन स्थळी येवू बसले असते आणि माझ्या मराठा तरूणांच्या वेदना, समस्या जाणून घेऊन त्या लगेच सोडवण्याचे आदेश केले असते, परंतु महाराष्ट्र अश्या नेतृत्वालाच मुकलाय आणि यातच आरक्षणाचा घात झालाय अशी खोचक प्रतिक्रिया राज्यातील मराठा समाज व्यक्त करत आहे.

मा. मुख्यमंत्री साहेब मराठा समाजाबरोबर वाईट भावनेने वागतील असे स्वप्नातही मराठा समाजाला वाटले नव्हते, साहेब मागण्याबाबत खोट्या मंजुरी तरी आपण मुख्यमंत्री आहात तोपर्यंत तरी देवू नका किंवा राज्य मंत्रिमंडळाकडून मराठा समाजाची फसवणूक होईल असे कोणत्याही मंत्र्याला वागू देवू नका कारण आपली प्रतिमा राज्यात चांगली होती, चांगली आहे आणि चांगली राहणार परंतु मराठा आरक्षणाविषयी आमच्या बरोबर फक्त दगा फटका करू नका.

साष्टपिंपळगाव आंदोलकांच्या मागण्याचे निवेदन आपल्या मंत्रिमंडळातील जबाबदार मंत्री महोदय माजी मुख्यमंत्री मा. अशोकरावजी चव्हाण साहेब घेऊन गेले आणि म्हणाले मा. उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे देवू मंजूर करून घेतो असे म्हणाले आणि मुंबईकडे मार्गस्थ झाले आणि मंत्री महोदय परत आलेच नाहीत हि मराठा समाजाची घोर फसवणूकच आहे.

मा. उध्दवजी ठाकरे साहेब तुमच्या नावाचा वापर करून मा. अशोकराव चव्हाण साहेब साष्टपिंपळगाव आंदोलकांना आश्वासन देऊन गेले आहेत, मा.चव्हाण साहेब मराठा आंदोलकांची चेष्टा करत आहेत, परंतु मा. ठाकरे साहेब आपले नाव सांगून आंदोलकांची फसवणूक करू नका अशी कान उघडणी मा. चव्हाण साहेब यांची करा नसता त्यांच्यामुळे संतापाची लाट तयार होईल, मा. उध्दवजी ठाकरे साहेब आपल्या विषयी त्यांच्यामुळे मराठा समाजात गैरसमज निर्माण होत आहे, नसता आंदोलन ठिकाणी दिलेले वचन मा. चव्हाण साहेब यांनी पुर्ण करावे.

साष्टपिंपळगाव आंदोलन हे मराठा आरक्षण हक्काचेच मिळावे म्हणून उभे आहे, या आंदोलनाला सरकारने उद्रेकाची धार देवू नये, आमच्या हक्काचेच आम्हाला द्या ते देण्यास सरकारने कुचराई करू नये, साष्टपिंपळगावकर टाहो फोडतोय फक्त आरक्षण द्या, राजकारण्यांची संपत्ती मागत नाही आम्ही, मराठा मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षण द्यावे हा साष्टपिंपळगावकरांचा कायदेशीर अट्टाहास आहे.

रात्रदिवस घाम गाळून आपल्या लेकराला मराठा बाप शिक्षण देतो आणि आरक्षणा अभावी त्यांचा जवान मुलगा वनवन भटकतो, हि परिस्थिती काळिज पिळवटून टाकणारी आहे, याचा गांभीर्याने मुख्यमंत्री यांनी विचार करावा, नसता येणारा काळ हा महाभयंकर असंतोष खदखदून उफाळून आलेला असेल, जर राज्य शांततेत ठेवायचे असेल तर या भानगडी वाढवू नये असे वाटत असेल तर सरकारने मराठा आरक्षण जाहिर करावे असे आवाहन साष्टपिंपळगाव आंदोलक श्री, मनोज जरांगे पाटिल यांनी केले आहे.

मा. गायकवाड आयोगाने कायदेशीर सर्वे करून मराठा समाजाला मागास आहे हे सिद्ध केले आहे तेच ओबीसीचे आरक्षण द्यावे अशी मागणी साष्टपिंपळगाव आंदोलक करत आहेत, महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या हितासाठी आज अख्खे गावच जिवाची बाजी लावून, आटापिटा करत आहे, आरक्षण तर आम्ही मिळणारच मग सरकार ते कोणतेही असो, आमच्या आंदोलनामध्ये कोणत्याही पक्षाने राजकारण आणू नये नसता कोणाचीही गैय केली जाणार नाही, राज्यात असंतोष पसरण्याच्या आत आणि मराठ्यांचा संयम सुटण्याच्या अगोदरच मराठा आरक्षण जाहिर करा,
मा. मुख्यमंत्री साहेबांनी साष्टपिंपळगाव आंदोलकांना प्रत्यक्ष भेटून, विश्वासात घेऊन, मागण्याची तातडीने स्व:ताहा मुख्यमंत्री या नात्याने दखल घेतली पाहिजे नसता दि, ७ मार्चला राज्यातील लाखो मराठ्यांचा साष्टपिंपळगावात “आरक्षण आक्रोश” मेळावा घेऊन सरकारला घाम फोडल्याशिवाय सकल मराठा समाज शांत बसणार नाहीत असा प्रखर इशाराच साष्टपिंपळगाव आंदोलकांनी दिला आहे.

आजही ३७ व्या दिवशीही साखळी उपोषणास वयोवृद्ध ६५ ते ७० वर्षाच्या महिला भगिनींनी बसलेल्याच आहेत.

error: Content is protected !!