ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

एका आरपीएफ जवानाने कल्याणच्या मनसे पदाधिकाऱ्यांना हिंदीत बोलायला सांगितलं, यावरुन मनसे पदाधिकाऱ्यांनी भर रस्त्यात जवानाची शाळा घेतली

कल्याण (ठाणे) : महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा यायलाच हवी, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे. मनसेच्या याच मुद्द्यावरुन मराठी माणसाचा मनसेला खंबीर पाठिंबा आहे. याशिवाय या मुद्द्यासाठी मनसे अनेकवेळा आक्रमक झाल्याचं आपणही बघितलं आहे. मनसेचा असाच काहीसा आक्रमकपणा कल्याणमध्ये बघायला मिळाला आहे. एका आरपीएफ जवानाने कल्याणच्या मनसे पदाधिकाऱ्यांना हिंदीत बोलायला सांगितलं, यावरुन मनसे पदाधिकाऱ्यांनी भर रस्त्यात जवानाची शाळा घेतली

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पश्चिमेतील स्कायवॉकवर तृतीयपंथीय नागरिकांकडून जबरदस्तीने पैसे घेतात, अशी तक्रार मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे आली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, मनसे पदाधिकारी रोहन आक्केवार आणि इतर कार्यकर्ते काल (25 फेब्रुवारी) रात्री स्टेशन परिसरात पोहोचले. गाडी पार्किंग करत असताना तेथील आरपीएफ जवनांनी मनसे पदाधिकाऱ्यांना मज्जाव केला.

आरपीएफ जवान हिंदीत बोलत असल्याने एका कार्यकर्त्याने मराठीत बोला, असं सांगितलं. त्यावर जितेंद्र सिंग नावाच्या जवानाने तुम्ही हिंदीत बोला, मला मराठी येत नाही, असे उत्तर दिले. त्यानंतर मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर आणि इतर कार्यकर्त्यांनी त्या आरपीएफ जवानाची भररस्त्यात मराठीची शाळा घेतली. “महाराष्ट्रात ड्युटी करता आणि मराठी बोलता येत नाही. आम्हाला सांगता हिंदीमध्ये बोला हे चालणार नाही”, असा सज्जड दम दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

यानंतर सर्व मनसे कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा तृतीयपंथीयांकडे वळवला. मनसे कार्यकर्त्यांना पाहून तृतीय पंथीयांनी पळ काढला. फक्त एक तृतीय पंथी त्यांच्या हाती लागला. त्याला पकडून महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात देत यापुढे असा प्रकार होता कामा नये, असे तृतीयपंथीयाला सांगितले

error: Content is protected !!