ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे निवासस्थानी गोंधळ घालून पोलिसास धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे निवासस्थानी गोंधळ घालून पोलिसास धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

अंबाजोगाई:-येथील ४ थे जिल्हा व सत्र न्यायालयात सत्र के.नं.८१/२०१९ सरकार वि.
बाळासाहेब या प्रकरणाची सुनावणी होऊन आरोपी बाळासाहेब उर्फ बालासाहेब महादेव आदमाणे रा.मुकुंदराज कॉलनी, अंबाजोगाई याची सबळ पुराव्याअभावी मा.न्या.एस.के.चोंदते साहेब यांनी दि.२५/०२/२०२१ रोजी निर्दोष मुक्तता केली.
सदरील प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, दि. ०५/०६/२०१६ रोजी आरोपी
बाळासाहेब उर्फ बालासाहेब महादेव आदमाने हा.उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे निवासस्थाना समोर मोठमोठ्याने आरडाओरडा करून गोंधळ घालत असताना त्यास फिर्यादी पो.ना.चंद्रकुमार अंबेकर यांनी येथे गोंधळ घालू नकोस , येथुन निघून जा असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असताना आरोपीने फिर्यादिस तू मला येथून जा म्हणणारा कोण, तुझ्यासारखे छप्पन पोलीस पाहिलेत असे म्हणून शिवीगाळ करून धक्काबुक्की व चापटाने मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला
अशा प्रकारची फिर्याद दिल्यावरुन पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथे २७४/२०१६ कलम ३५३,३३२५०४ भा.दं. वि.नुसार गुन्हा नोंद करण्यात आला व प्रकरण सुनावणी साठी मा.जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले.
सदरील प्रकरणाची सुनावणी मा.न्यायालयात झाली असता फिर्यादी पक्ष्यातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले, फिर्यादी पक्ष आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करू न शकल्यामुळे व आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद व बचाव गृहीत धरून आरोपी बाळासाहेब उर्फ बालासाहेब महादेव आदमाने रा.मुकुंदराज कॉलनी, अंबाजोगाई याची सबळ पुराव्याअभावी मा.न्या.एस.के.चोंदते साहेब यांनी दि.२५/०२/२०२१ रोजी निर्दोष मुक्तता केली.
सदरील प्रकरणात आरोपीतर्फे अँड.अनंत सोनवणे यांनी अँड.राहुल मुंडे,अँड.अजित लोमटे, यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले त्यांना अँड.दिलीप चामनर यांनी सहकार्य केले.

अँड.अनंत सोनवणे
9767212777

error: Content is protected !!