ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

जि. प. माध्यमिक शाळा धोंडराई येथे मराठी दिन उत्साहात साजरा

जि. प. माध्यमिक शाळा धोंडराई येथे मराठी दिन उत्साहात साजरा
गेवराई -दि. २७ ( वार्ताहर ) – कवीवर्य कुसमाग्रज यांची जयंती व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जि.प.माध्यमिक शाळा, धोंडराई येथे ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत प्रसिद्ध कवी, कथा-कादंबरीकार संतोष विठ्ठल घसिंग यांची मुलाखत घेण्यात आली.
घसिंग यांनी आपला प्रेरणादायी असा संपूर्ण वाचन व लेखन प्रवास दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर मांडला.
‘पालाणचिरा’, ‘विधाराद्रोण’, ‘शून्यातला चंद्र’, ‘काजळकुकु’, इत्यादी प्रसिद्ध साहित्यकृती लिहिणारे घसिंग यांचा प्रवास प्रश्नोत्तर रुपाने दीड तास रंगला.
यावेळी त्यांची प्रकट मुलाखत धर्मराज करपे यांनी घेतली.
विविधांगी प्रश्नांना उत्तरे देताना घसिंग यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेतील विद्यार्थीनींनी स्वरचित काव्यवाचन केले. अक्षरा भालशंकर, मोनिका साखरे व मोनिका पांढरे या विद्यार्थीनींनी उत्तम कविता सादर केल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू जाधव यांनी केले तर सुत्रसंचालन संतोष कोठेकर यांनी केले.
आभारप्रदर्शन नितीन माळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश शहाणे तर प्रमुख उपस्थिती म्हणून अरुण खरात व कृषी सहाय्यक परीक्षित करपे उपस्थित होते.
यावेळी प्रशालेतील शिक्षक बप्पासाहेब काळे, संजय पांढरे, जालिंदर ठवरे, साहेबराव बरकते, प्रकाश खरात, प्रेम सिडाम, प्रवीण गायकवाड, नीतीन ढाकणे उपस्थित होते.

error: Content is protected !!