ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

शहराची 30 वर्षाची तहान भागणार:दरडोई दरदिन 135 लिटर शुद्ध जल मिळणार-डॉ भारतभूषण क्षीरसागर

शहराची 30 वर्षाची तहान भागणार:दरडोई दरदिन 135 लिटर शुद्ध जल मिळणार-डॉ भारतभूषण क्षीरसागर
सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात
बीड दि.1(प्रतिनिधी):- शहराची 30 वर्षाची तहान भागली, दरडोई दरदिन 135 लिटर जल प्रत्येकाला मिळेल ही दीर्घकालीन योजना आता पूर्णत्वास जात असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून अमृत अटल व भुयारी गटार साठी तब्बल 400 कोटी आणणारे मराठवाड्यातील एकमेव नगराध्यक्ष यांचा आणखी एक प्रकल्प 96 टक्के पूर्ण झाला असून एप्रिल पासून समांतर जलवाहिनी प्रमाणे जल वाटप होणार असल्याची माहिती खुद्द नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली . ईट येथील जलसुद्धीकरण प्रकल्प पाहणी दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. 2051 पर्यंत बीड शहराचा पाणी प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे, आता शहराला 50 एम एल टी पाणी मिळणार असून प्रती व्यक्ती 135 लिटर आणि तेही प्रतिदिन प्रमाणे मिळेल अशी शक्यता आहे . विकासाच्या कामात एमजीपीचे पाप आमच्या माथी मारून त्याची भरपाई आम्ही विधान सभेत केली मात्र आज विकासाचा मोठा खड्डा पडला आहे तो देखील जनतेच्या लक्षात आलेला आहे, मात्र विकास हाच अजेंडा आपला असल्याने विकास थांबू देणार नसल्याची ग्वाही डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली.
बीड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जलशुध्दीकरण केंद्र,ईट येथील अमृत अटल पाईपलाईन व सोलार प्रकल्पाच्या चालु असलेल्या कामाचा आढावा नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी रविवारी घेतला. बीड नगर परिषदेला जल शुद्धीकरण प्रकल्पाचा विद्युत शुल्क खर्च 40 लाख येतो मात्र ईट येथे 8.45 कोटीचा 1000 किलोवॅट क्षमतेचा सौर उर्जेचा प्रकल्प उभा राहतोय, ज्यातून 4 ते 5 हजार युनिट प्रतिदिन उर्जा मिळेल, प्रतिमाह 20 लाख रु पर्यंत बचत होणार आहे. 200 एच.पी.चे 5 पंप या उर्जेवर चालतील. मराठवाड्यातील सर्व न.प. ने दर वाढवलेले असताना बीड मध्ये मात्र नळपट्टी, घरपट्टी वाढवलेली नाही. जिथे 8 कोटी पाणी पुरवठ्यावर खर्च येतो तिथे वसुली केवळ 2 कोटी होते बाकी खर्च अन्य योजनेतून करावा लागत असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे सदरील योजनेचे काम असुन ही योजना 2019 मध्ये मा.मंञी जयदत्तजी (आण्णा) क्षीरसागर,नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी मंजुर करुण आणली होती. 2051 सालच्या लोकसंख्येचा विचार करुन ही योजना आखण्यात आलेली आहे.याचे काम आता पूर्णत्वास जात असुन लवकरच शहरातील जनतेला 1 ते 2 दिवसाआड पाणी यामुळे मिळणार आहे. येथील सोलार प्रकल्पामुळे जे वीज बील नगर परिषदेस महिन्याकाठी 40 लाख यायचे ते यामुळे आता अर्ध्याच्यावर म्हणजे 20 लाख वीज बिलाची बचत होणार आहे. प्रसंगी सभापती बांधकाम विनोद मुळूक,सभापती विद्युत किशोर पिंगळे,सभापती पाणीपुरवठा इलियास भाई,नगरसेवक सतिष पवार व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आदि उपस्थित होते.
यावेळी गिरी यांनी प्रास्ताविक करताना सांगितले कि बीड शहरात तब्बल 8 नव्या टाक्या तयार होत असून शहराला पाणी कमी पडणार नसल्याचे समोर आलेले आहे. जिथे लातूर ला रेल्वेने पाणी आणावे लागले त्यावेळी बीड शहरात हक्काचे पाणी होते, हे क्षीरसागर नेतृत्वाचे यश असल्याचे ते म्हणाले, अमृत पाणी पुरवठा योजनेत तब्बल 114.63 कोटीच्या या योजनेत केंद्राने 33.65 व राज्य शासन 21.34 कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. 100 टक्के काम पूर्ण झाल्याचे कळविण्यात आलेले आहे, 80 टक्के पाईप लाईन चे काम पूर्ण झालेले आहे. शुद्ध जलवाहिनीचे काम 14 किलोमीटर पूर्ण झालेले आहे. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी सेवेची सिद्धता करताना एक मोठा प्रकल्प लोकसेवेत उभा केला आहे. अभ्यास व पाठपुरावा हा दृष्टीकोन डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी ठेवल्याने ही कामे होत आहेत.

चौकट
आमच्या नेतृत्वाच्या नखाची तरी बरोबरी करा – विनोद मुळूक
गेली 15 वर्षे नगरसेवक म्हणून आपण माजी मंत्री जयदत्त अण्णा व अध्यक्ष साहेबांच्या सोबत काम करत आहोत, आरोप प्रत्यारोपाचे राजकारण करणारांनी विकास काय असतो, त्याची जबाबदारी काय असते हे जाणून घेण्यासाठी ईट येथील प्रकल्प पहावा, कोट्यावधी रुपये आणून जनसेवा कशी करतात ते पहावे. पत्रके काढणे सोपे असते विकास करणे कठीण आहे. आपण अध्यक्ष साहेबांचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान असल्याचे विनोद मुळूक यांनी म्हटले.
———————————————————————-

error: Content is protected !!