ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

सावधान…..! कोरोना वाढतोय….?

सावधान…..! कोरोना वाढतोय….?

कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे जगातील सर्वाधिक कोरोनाना बाधित पहिल्या १५ देशाच्या यादीत भारत पोहोचला असून गेल्या ३० जानेवारीला इंडोनेशिया, पोर्तुगाल ,आयर्लंड ला मागे टाकत, आपला भारत देश १७ व्या क्रमांकावर आहे. हे गंभीर असून महाराष्ट्र, केरळ, पंजाब, मध्य प्रदेशात रुग्णांची संख्या मागील काही दिवसात वाढताना दिसत आहे.
कोरोना विषाणूने गेल्या अकरा महिन्यापासून जगावर थैमान घातले आहे. वरचेवर परिस्थिती सुधारत चालली असे वाटत असतानाच, आपल्या बेफिकीर वागण्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांची दखल नागरिकांनी न घेतल्याचा परिणाम आता सामोरे जात आहे राज्यातून दर दिवशी समोर येणारे नवीन रुग्णांची आकडेवारी भयावह आहे. विदर्भ, कोकण,मुंबई महानगरातील ही संख्या वाढत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे, अनेक जिल्ह्यात प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन/ जमावबंदी लागू केली आहे. प्रशासनाने केलेल्या वारंवार सूचनांचे पालन न केल्याचा हा परिणाम आहे कोरोना काळात संसर्ग होऊ नये, म्हणून जे नियम अटी आहेत ते काही जणांच्या बेफिकीर वागण्यामुळे इतरांनाही त्यांच्यासोबत सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू केले, राज्यातील व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू रेल्वे, हॉटेल, मॉल, प्रवास आदी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. इतरही घटक पुन्हा नव्याने सुरू व्हावेत सर्व व्यवहार नियमित व्हावी याचे प्रयत्न चालू आहेत पुन्हा कोरोना ची दुसरी लाट येण्याची लोकांच्या बेपर्वाह वागणुकीमुळे शक्यता वाढली आहे. लोक प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊनही, तसेच वागत आहेत. त्याचा परिणाम रुग्ण वाढत आहेत परिस्थिती आटोक्यात आली अशी वाटत चालली असतानाच पुन्हा लॉकडाऊन कडे आपण चाललो आहोत.
‘अनलॉक’ च्या दरम्यान रुग्ण संख्या कमी होत असतानाच, पुन्हा लोक सार्वजनिक कार्यक्रमात गर्दी करणे, इतर ठिकाणी गर्दी करणे, नियमाचे पालन न करणे आदी, बेफिकीरीने वागताना दिसत आहेत प्रशासनाने वारंवार सांगूनही मास्क न लावणे, लावला तर योग्य न लावणे नाका- तोंडाच्या खाली घेतलेला असणे, एखाद्याने सांगितले तो मास्क व्यवस्थित लावा तर त्याना ना ना कारणे सांगणे सोशल डिस्टंसिंग न पाळणे,सॅनिटायझर किंवा हात न धुणे इतरांनी जर काही सांगितले तर त्यांना उलट कोरोना गेला आता आता कशाचा कोरोना असे समजून सांगणे, त्यामुळे पुन्हा एकदा या विषाणूने आपले डोके वर काढलेले दिसत आहे. याचा परिणाम वाढते रुग्ण संख्या आहे याला कुठेतरी सर्वांनीच नियमांचे पालन करणे गरजेचे असून ती काळाची गरज आहे.
गेले अकरा महीने कोरोनाचा कठीण प्रसंग आपण सर्वांनी अनुभवला आहे, जीव मुठीत धरून काढले आहेत याचे गांभीर्य सर्वांना आहे हे अजूनही काही जणांच्या चुकीमुळे त्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागत आहे आणि लोक असे जर पुढे वागले तर सर्वांना याला सामोरे जावे लागेल हे निश्चित आहे.
कोविड-१९ चा वाढत चाललेला परिणाम मध्यंतरी कमी झालेला दिसत असतानाच संबंध देशात रूग्णांची संख्या घटत चालली असतानाच, सरकारने नियम शिथिल केले सर्व परिस्थिती पूर्ववत आणण्याचे प्रयत्न केले.भारतात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू केली,, आपल्याला लसीला यशही आले सर्व काही ठीक होत असतानाच लोकांच्या बेफिकीर वागल्याने लोकांना कुठलीच भीती न राहिल्याने, काही लोक पहिल्या सारखे वागू लागल्याने पुन्हा या विषाणूने परिणाम दाखवायला सुरुवात केली आहे. लोकांनी काही दिवस मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे ,सॅनिटायझर इतर वापर करणे आदीसह इतरही नियमांचे नियमित पालन करणे हे त्यांना जमत नाही याचा परिणाम सर्वांना भोगावा लागत आहे काय काहीची चूक इतरांना संकटात ओढत आहे. सोशल मिडिया च्या माध्य मातून, टीव्ही इतर साधनांच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून, प्रशासन आरोग्य विभाग, महानगरपालिका तसेच अनेक मान्यवर आदि वेळो वेळोवेळी जनजागृती करत आहेत सर्व यंत्रणा कोरोणाच्या विरोधात हे एक होवून लढत आहेत हे सर्व आपल्यासाठीच ना मग का एवढी बेफिकिरी ?
कोविड-१९ या महामारीला सोबत काही दिवस घेऊनच जगायचे आहे, असे आपणास डॉक्टर / तज्ञ मंडळी सुरुवातीपासूनच सांगत असतानाच घरा बाहेर जाताना आपल्या नियमित व्यवहारिक जीवन जगत असताना मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे हे साध्या गोष्टी पाळणे, जर जमत नसतील तर याचा परिणाम भयानक आहे.नुसत्याच नियमांच्या पाट्या/ बॅनर लावून किंवा नियम करून काय उपयोग याचा जर काही लोक नियमच पाळत नसतील तर ? ते सर्वांसाठी च आहेत.ते काटेकोर पाळले जाने गरजेचे आहे.
आज महाराष्ट्रात काही जणांच्या बेफिकीर वागण्यामुळे पुन्हा कोरोणा चा हा भयानक विषाणूं डोकवर काढताना दिसत आहे. काही व्यक्ती कोरोणाच्या या विषाणूची लागण होऊन बरेही झाले आहेत, पण त्यांच्या वागण्यात गांभीर्य नाही त्यांनी तर त्यांच्यासोबत इतरांची काळजी घेत या विषाणूचे परिणाम लोकांना सांगितली पाहिजे.त्याविषयी जनजागृती केली पाहिजे,हे महत्वाचे आहे. आज सर्व स्तरातून प्रशासन कोरोणा च्या विरोधात मोठ्या एकीने लढत आहे, सर्व आरोग्य यंत्रणा यासाठी सज्ज आहेत सर्व प्रशासन सर्व परिने आपापली कार्ये करत आहे, त्यांना इतरांनीही मनापासून साथ देणे गरजेचे आहे. आज जरी लस उपलब्ध असली तरी आपण सर्व नियम पाळणे गरजेचे आहे,त्याचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे.
आज बहुतांश सर्व व्यवहार पूर्वपदावर आलेले आहेत, प्रशासनाने वेळोवेळी मार्गदर्शन करूनही लोक यांचे पालन करताना दिसत नाही ज्या ठिकाणी गर्दीचे ठिकाण आहे त्या ठिकाणी बेफिकिरीने वागत आहे, ते चालणार नाही याचा परिणामाला आपल्यालाच सामोरे जावे लागेल. या कोरोनाविषयी सर्वांनी गांभीर्याने घेणे महत्त्वाचे आहे, सर्वांनी ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणचे नियम पाळले पाहिजेत,त्या ठिकाणी सुरक्षित अंतर राखणे, मास्क लावणे, सॅनिटायझर करणे, कामाशिवाय जास्त फिरू नये, गर्दी करू नये आदीबाबी आपण करणे गरजेचे आहे ,हे पाळले पाहिजे सतत लाॅकडाऊन हे जर आपणास आपल्या बेशिस्त वागण्यामुळे करावे लागत असेल, तर मागील असलेल्या लॉकडाउन मधून आपण काय शिकलो? आपला किंचित गाफीलपणा म्हणजे कोरोनाला आमंत्रणच.कोरोनाला रोखणे व त्यावर मात करणे हे नियम पाळल्या वर च शक्य आहे. ते आपण केले पाहिजे.
पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आणू नका, सर्व नियमांचे पालन आपणा सर्वांना करायचे आहे,आपणा सर्वांना कोरोना विषाणूचे गांभीर्य लक्षात घेता निदान पुढील काही दिवस तरी सवय काटेकोर पाळणे गरजेचे आहे. हे लक्षात घ्या सर्व नियमांचे पालन व आपला संयम हाच खरा खुरा पर्याय असून हा खरा आहे.
तर चला मग,
पुन्हा या कोरोनाला हरवू या,
सर्व नियमांचे पालन करू या,
बाहेर जाताना काळजी घेऊ या,
नाकाला मास्क योग्यप्रकारे लावू या,
सुरक्षित अंतुर ठेवू या,
वेळच्या वेळी हात स्वच्छ धुवू या,
या कोरोनाला आपण सर्व मिळून, हारवू या…!

– राहुल आर.मोरे.
क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक
शासकीय माध्यमिक शाळा ता.आष्टी जि.बीड

error: Content is protected !!