ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

आरोग्य विभागाची झालेले पेपर त्वरित रद्द करावे-अमोल तांबे पाटील.

आरोग्य विभागाची झालेले पेपर त्वरित रद्द करावे-अमोल तांबे पाटील.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️गणेश शेवाळे | पाटोदा.
आरोग्य विभागाच्या पद भरतीसाठी रविवारी परीक्षा घेण्यात आली. परीक्षा मध्ये झालेल्या घोळामुळे बरेच परीक्षा सेंटरवर गोंधळ दिसून आला. आरोग्य विभाग कितीही म्हणाले की आम्ही पेपर पारदर्शकपणे घेतला. तरी त्यांचा घोळ सर्वांपुढे उघड झाला आहे.
एका बाजूला मुले वर्षानुवर्षे अभ्यास करतात. तर दुसर्‍या बाजूला डमी विद्यार्थी बसून पेपर दिले जात आहे. औरंगाबाद, नाशिक, नागपूर व नगर मध्ये परीक्षा व्यवस्थेचे ढिसाळ वर्तन दिसून आले. औरंगाबाद आणि नागपूर मध्ये प्रश्न पत्रिका परीक्षेपूर्वीच फुटल्याची तक्रार आहे.कोरोना झपाट्याने वाढत आहे. तरी कोरोनाचे नियम धाब्यावर ठेवून एका बाकावर दोन उमेदवार बसवले. सामुहीक कॉपीचे प्रमाण ही वाढले. परिक्षेची वेळ झाली,सेंटर वर उमेदवार पोहोचले तरी परीक्षा सेंटर उघडे झाले नव्हते. अशा अनेक तक्रारी विद्यार्थ्यांकडून आलेले आहेत. काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक गॅझेट व इंटरनेटचा वापर करून प्रश्नपत्रिका सोडवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.
अशे सर्व घोळ समोर आल्यामुळे खाजगी कंपनीने घेतलेली ही परीक्षा त्वरित रद्द करावी. आणि एमपीएससीमार्फत ही परीक्षा घेण्यात यावी. अशी मागणी स्पर्धापरीक्षा समिती समन्वयक अमोल तांबे पाटील यांनी केली आहे.अन्यथा अंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.

error: Content is protected !!