ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

पूजा चव्हाणच्या आई-वडीलांनी संजय राठोडांकडुन पाच कोटी घेतल्याचा गंभीर आरोप.

पूजा चव्हाणच्या आई-वडीलांनी संजय राठोडांकडुन पाच कोटी घेतल्याचा गंभीर आरोप.

🔸अशोक काळकुटे | संपादक

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील पूजा चव्हाण हिच्या पुण्यामध्ये बिल्डींगमधुन पडुन झालेल्या संशयास्पद मृत्यू नंतर या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आले आणि त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते.
दरम्यान काल वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.
या प्रकरणी पूजा चव्हाण चे आई-वडील मात्र आमची मुलगी डिप्रेशन मध्ये‌ होती यामुळेच तिने आत्महत्या केल्याचे सांगत आहेत. परंतु याप्रकरणात आणखी एक मोठा आरोप पूजाच्या आई-वडिलांवर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे स्वत:ला पूजा चव्हाणची चुलत आज्जी म्हणुन सांगणाऱ्या परळी तालुक्यातील काठोडा तांडा येथील शांताबाई राठोड यांनीच हे आरोप केले आहेत.
त्यांनी दिलेल्या व्हिडीओ स्टेटमेंट मध्ये म्हटले आहे कि, हा संपूर्ण प्रकार दडपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या आई-वडीलांना पैशापुढे स्वत:च्या मुलीची किंमत नाही तर मी चुलत आज्जी कुठली कोण ओ? . समाजाची तर दिशाभूल त्यांनी केलीच आहे. परंतु मुख्यमंत्र्यांची देखील दिशाभूल पूजा चे आई वडील करत असल्याचा देखील गंभीर आरोप शांताबाई राठोड यांनी केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये मुख्यमंत्र्यांना देखील तुमची दिशाभूल पूजाचे आई-वडील करत असल्याचे शांताबाईंनी म्हटलेलं आहे. हे सत्य नाही. तुम्हाला जर पूजा चे आई-वडील म्हणत असतील ही चुलत आज्जी नाही ‘ लेकराच्या न्यायासाठी जर हे पुढे येत नसतील ‘ तर यांना संजय भाऊ राठोड यांनी पाच कोटी रुपये देऊन तोंड बंद केल्याचा गंभीर आरोप यामध्ये शांताबाई राठोड यांनी केला आहे. हे आयुष्यात कधीच म्हणणार नाहीत कि आमची मुलगी चांगली होती म्हणून ‘ त्यांचा आवाज कधीही दबकाच निघणार , शेवटी या व्हिडिओ स्टेटमेंट मध्ये शांताबाई राठोड यांनी हा संपूर्ण पैसा घरात जमिनीमध्ये पुरून ठेवला असे देखील म्हटले आहे परंतु यामध्ये कितपत सत्य आहे हे तपासा नंतरच समोर येईल.

शांताबाई राठोड आज तृप्ती देसाई यांच्या भेटीला.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणा वर दिलेल्या व्हिडिओ स्टेटमेंट नंतर परळी तालुक्यातील शांताबाई राठोड या आज तृप्ती देसाई यांच्या भेटीला गेलेल्या आहेत.
या भेटीनंतर पुन्हा नवीन काही समोर येईल का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

कोण आहेत शांताबाई राठोड?

मूळच्या परळी वैजनाथ तालुक्यातील काठोडा तांडा या ठिकाणच्या राहणाऱ्या शांताबाई राठोड या समाज सेविका आहेत.
यापूर्वी त्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परळी तालुक्यातील अवैध धंदे आणि दारू बंद करण्यासाठी आमरण उपोषण केले होते.
त्या शांताबाई राठोड यांनी आता पूजा चव्हाण ची चुलत आज्जी असल्याचा दावा केला आहे.
आणि यानंतर हे संपूर्ण स्टेटमेंट दिलेले आहे. परंतु या नात्याला पूजा चव्हाण च्या आई-वडिलांनी दुजोरा दिलेला नाही.

error: Content is protected !!