ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

हिंगोलीत ०७ मार्चपर्यंत कडक संचारबंदी.

हिंगोलीत ०७ मार्चपर्यंत कडक संचारबंदी.

🔸अशोक काळकुटे | संपादक

हिंगोली- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे वेगवेगळे प्रतिबंधात्मक उपाय राबवले जात आहेत. हिंगोली जिल्ह्यातही ०७ मार्चपर्यंत सकाळी ०७ ते रात्री १२ या कालावधित कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हा आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक करावाई केली जाणार आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या शहरांमध्ये तर हा संसर्ग इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. राज्यात अमरावीत, यवतमाळ अशा ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर पुण्यासारख्या ठिकाणी रात्रीची संचारबंदी आहे. त्यात हिंगोली जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आगामी सात मार्चपर्यंत सकाळी ०७ ते रात्रीचे १२ अशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात ग्रामीण तसेच शहरी हद्दीतील सर्व व्यक्ती आणि वाहन प्रवासास मज्जाव करण्यात आला आहे.

राज्यात लॉकडाऊन लागणार का?‌

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मागील आठवडाभरापासून वाढणारे कोरोना रुग्ण पाहता यावर नियंत्रणासाठी केवळ लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे की इतर काही यावरही विचार केला जातोय. मात्र, सध्या तरी राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना हॉटस्पॉट सापडत आहेत तेथे कठोरपणे निर्बंध लादले जात आहेत. मात्र, सरसकटपणे लॉकडाऊन लावणं सरकार टाळत आहे. यामागे मागील लॉकडाऊन काळात विस्कटलेली आर्थिक घडी आणि सर्वसामान्यांचे हाल हाही दृष्टीकोन आहे. त्यामुळेच सध्या तरी राज्यात जेथे कोरोना हॉटस्पॉट तेथे निर्बंध असंच धोरण आहे.

error: Content is protected !!