ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

पवारांकडुन मोफत ए.आय.एक्सरे व सी.बी.सी रक्त चाचणी निदान मोबाईल क्लिनिक व्हॅनचा शुभारंभ.

पवारांकडुन मोफत ए.आय.एक्सरे व सी.बी.सी रक्त चाचणी निदान मोबाईल क्लिनिक व्हॅनचा शुभारंभ.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️धनराज पवार | जामखेड.
जामखेड- मा.ना.अजितदादा पवार, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली, एच.डी.एफ.सी बँकेच्या सहकार्यातून व मा.आ.श्री. रोहित दादा पवार आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या माध्यमातून मोफत ए.आय. एक्सरे व सी‌.बी.सी रक्त चाचणी, ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे सकाळी नऊ वाजता कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांच्या हस्ते निदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.कुंडलिक अवसरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, माजी नगरसेवक दिगांबर चव्हाण, ज्येष्ठ नेते वैजनाथ पोले, प्रकाश सदाफुले ,माजी नगरसेवक पवन राजे राळेभात, उमर कुरेशी, प्रकाश काळे, हरिभाऊ आजबे, राजेंद्र शिंदे ,अमीत जाधव, बाबासाहेब मगर, इस्माईल सय्यद, सचिन शिंदे, प्रशांत राळेभात, युवा नेते महेश राळेभात , अमोल गिरमे, प्रा. राहुल अहिरे आदि उद्घाटनास उपस्थित होते.

या फिरत्या दवाखान्याचा फायदा जामखेड तालुक्यातील ८७ गावांमध्ये होणार आहे.
पुढील एक महिन्यांमध्ये या फिरत्या दवाखान्याची प्रक्रिया चालू होत आहे. तसेच BP व शुगर यावर या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून किरकोळ आजारावर व BP, शुगर यावर मोफत औषधोपचार होणार आहेत.

तसेच या फिरत्या दवाखान्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा. असे बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील बोराडे यांनी सांगितले.
बऱ्याच लोकांना आपले आजार माहीत नसल्यामुळे दगावण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते, खेड्यापाड्यात ,गाव वस्तीवर, गावातील लोकांची रक्तदाब तपासतील व इतर आजाराची तपासणी तसेच प्राथमिक उपचार करणे या मोबाईल क्लिनिकच्या द्वारे मोफत तपासणी केली जाणार आहे . एचडीएफसी बँकेच्या सहकार्यातून ४५ वर्षाच्या पुढच्या लोकांसाठी ही आरोग्य सेवा मोफत दिली जाणार आहे चांगले तज्ञ डॉक्टर यांची टीम तपासणी यंत्रणा बरोबर आरोग्य सुविधेचा नागरिकांसाठी फायदा होणार आहे .
या फिरत्या दवाखान्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा.
असे बोलताना कर्जत जामखेड विधानसभा चे प्रमुख प्राध्यापक मधुकर आबा राळेभात यांनी सांगितले.
या शिबिरास मोठ्या प्रमाणात रुग्णांनी प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!