ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

गायींची तस्करी करणार्‍या टोळीकडून स्नेहनगरमधील रहिवाशांवर दगडफेक ; पोलिसांना वारंवार सांगूनही कारवाई नाही !

गायींची तस्करी करणार्‍या टोळीकडून स्नेहनगरमधील रहिवाशांवर दगडफेक ; पोलिसांना वारंवार सांगूनही कारवाई नाही !

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️प्रेमनाथ कदम | परळी.
शहरातील स्नेहनगरमध्ये दररोज रात्री अनेक गायांचाकळप मुक्कामी असतो काही दिवसांपासून येथील गायी मध्यरात्री ०२ ते ०३ च्या दरम्यान जनावरांची तस्करी करणारी टोळी घेऊन जात आहे. हि बाब शहर पोलिसांना वारंवार सांगून ही काही कारवाई झाली नाही. शनिवार दि.२७ फेब्रुवारी २०२१ च्या रात्री ०३ वाजण्याच्या दरम्यान एका पांढर्‍या रंगाच्या बोलेरो गाडीत गायी घेऊन जाण्याच्या तयारीत असणार्‍या टोळीची कुणकुण एका नागरिकास लागली असता त्यांनी व त्यांच्या पत्नीने त्यांना विरोध केला असता त्या टोळीने सदरील पती पत्नीवर दगडांचा व विटांचा मारा केला व एक गाय घेऊन जाण्यास टोळी यशस्वी झाली.  या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गाईंची तस्करी करणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी  नागरिकांकडून होत आहे.
  गायी चोरी करणार्‍या टोळक्याने दगडफेक केल्याने गल्लीतील इतर एकजण गॅलरीत येऊन त्यांना विरोध करीत असतात त्यांच्या दिशेनं गॅलरीत दगडफेक केली. यामुळे एकच गोंधळ उडाला रात्रीच पोलिसांना याची माहिती शहर पोलीस ठाण्यात जाऊन दिली. हिंदू धर्मात गायीला गोमाता म्हणून संबोधले जाते शहरातील स्नेहनगर मध्ये अनेक गायचे कळप नित्य नियमाप्रमाणे सायंकाळी ०६ ते पहाटे ०६ वाजेपर्यंत तब्बल १२ तास मुक्कामी असते या गायी मुळे नागरिकांना थोडासा त्रास जरी होत असला तरी ती गोमाता असल्याने त्या त्रासाकडे दुर्लक्ष केले जाते. या गायी कोणाच्या आहेत. कोठून येतात याच्या काही थांगपत्ता नसला तरी नागरिक त्यांचा सांभाळ करतात. गेल्या दोन महिन्यां पासून रात्री ०२ ते ०३ च्या दरम्यान गायी चोरणारे टोळके येऊन गाडी मध्ये गायी घेऊन जात आहे याची माहिती पोलिसांला दिली पण कारवाई होत नाही अशी खंत काही नागरिकांनी बोलून दाखवली हिंदुत्ववादी संघटनांनी या कडे लक्ष देऊन गोमातेचे रक्षण करण्यासाठी पुढे यावे व पोलिसांनी या बाबीकडे गांभिर्यांने लक्ष देऊन या टोळक्यांच्या मुसक्या आवळ्याव्यात अशी मागणी जोर धरीत आहे.

error: Content is protected !!