ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

वाळू माफियांवर तात्काळ कार्यवाही करा नसता लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन-भाई दत्ता प्रभाळे.

वाळू माफियांवर तात्काळ कार्यवाही करा नसता लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन-भाई दत्ता प्रभाळे.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️बीड | प्रतिनिधी.
आज बीड निवासी जिल्हाधिकारी साहेब संतोष राऊत साहेब यांना निवेदन देत जिल्हयात बीड तालुक्यातील अनेक ठिकाणाहून बेकायदेशीर वाळू उपसा केला जातोय स्थानिक पोलीस ठाण्यायांचे या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बीड तालुक्यातील सिंदफना, तुकडेमोडी नदी पत्रातून नागापूर, ब्रम्हपूर, राक्षस भुवन, कुक्कडगाव, भाटसांगवी,कोपरा या ठिकाणाहून बेकायदेशीर वाळू उपसा केला जात असतांना देखील महसूल अधिकारी बघ्याची भुमिका घेत असल्याने वाळू माफिया रात्रंदिवस हा वाळू तस्करीचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहे. विशेष म्हणजे वाळू वाहतूक करणाऱ्या एकही टिप्परला नंबर नाही, ही गंभीर बाब आहे, या विणानंबर गाडीने एखाद्या व्यक्तीला डोळ्यासमोर धडक देऊन निघून गेले तर याला कोण जबाबदार असेल? त्याला कोणत्या पुराव्याने पकडायचे? गाडीची ओळखच नसल्यामुळे नंबर नसेल तर कोणाची तक्रार करायची.
सध्या सुरू असलेला हा तांडव कोणाच्यातरी निष्पाप जिवावर उठणार आहे याला जबाबदार कोण राहील? या वाळू माफियांना कोणाचेही भय नाही याचे कारण काय? या वाळू तस्करांवर महसूल प्रशासन यांचा वरदहस्त आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाचा महसूल बुडवणाऱ्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या महसूल व पोलीस अधिकाऱ्यांची वाळू माफियांची मिलीभगत आहे की काय ? असा प्रश्न शेकाप व या भागातील ग्रामस्थांना वाटत आहे. तरी मा.जिल्हाधिकारी साहेबानी सर्व वाळू माफियांवर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई मोहन गुंड,अड.नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकाप च्या वतिने लोकशाही मार्गाने तिव्र रस्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेकाप चे भाई दत्ता प्रभाळे,भाई भिमराव कुटे,भाई मुकूंद शिंदे ,भाई शरद वाघमारे,भाई गोरख घोडके,भाई माऊली घोडके, भाई अशोक जाधव, सोनवणे प्रविण ,ग्रामस्थ हे शेकाप पक्ष बीड तालुका कमिटीने दिला आहे.

error: Content is protected !!