ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

वांद्रे ग्रामपंचायत वर संजय जाधव यांचे वर्चस्व

कार्यकारी संपादक महेंद्र लोहोट

खेड तालुक्यातील वांद्रे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक पॅनल प्रमुख संजय जाधव यांची सत्ता आली आहे.
वांद्रे येथे दि.२५ रोजीची निवडणूक सरपंच व उपसरपंच पदाचे दोन्ही गटाकडून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मतदानावेळी गणसंख्येअभावी सभा तहकुब केली होती,

यावेळी ७ ,पैकी ६ सदस्य सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी दाखल झाले होते व एक सदस्य उपस्थित नव्हता निवडणुकीसाठी ग्रामस्थांच्या दबावामुळे त्याच उपस्थित राहता आले नाही असा दावा संजय जाधव यांनी केला प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेस संजय जाधव शशिकांत जाधव मंगल तांबेकर यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नव्हता तहकूब सभा 25 तारखेला घेण्यात आले त्यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा लावण्यात आला होता दुपारी दोन वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाल्यानंतर दुपारी तीन वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणूक निर्णय अधिकारी नवीन गुंडाळ यांनी काल जाहीर केला

सरपंच पदासाठी मंगल तांबेकर व रूपाली मेठल यांच्यामध्ये सरळ चुरशीची निवडणूक झाली त्यामध्ये मंगल तांबेकर यांना ४ रूपाली मेठल यांना ३ मते मिळाली तर उपसरपंच पदासाठी संजय जाधव दत्ता चौधरी व कांता सावंत यांनी उमेदवारी दाखल केला होता त्यामध्ये नितीन मेटल यांचा उमेदवारी अर्ज होता परंतु त्यावर सही नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला होता प्रत्यक्ष मतदानास संजय जाधव यांनी ४ मते घेतली तर विरोधी उमेदवार कांता सावंत यांना ३मते मिळाली संजय जाधव यांनी १ मताने दारुण पराभव केला त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे माजी सभापती सुरेश शिंदे सरपंच सुनील धंद्रे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुगंधा शिंदे माजी सरपंच चिंधु सावंत राजू सावंत तंटामुक्ती अध्यक्ष विनोद शिंदे लक्ष्मण तांबेकर संजय सावंत बाळू सावंत गणेश सावंत पांडुरंग सावंत नितीन रोकडे सिताराम सावंत यांचे सरपंच उपसरपंच निवडणुकीत मोलाचे सहकार्य मिळाले असे पॅनलप्रमुख व उपसरपंच संजय शेठ जाधव यांनी सांगितले

*निवडणूक घेण्यास मज्जाव*

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नवीन मंडल यांनी काम पाहिले सहाय्यक म्हणून ग्रामसेवक कदम यांनी मदत केली त्यावेळी मंडल अधिकारी व तलाठी उपस्थित होते कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये म्हणून गावातून मिरवणूक काढण्यात मज्जाव करण्यात आला होता त्यावेळी डीवायएसपी मंदार जावळे व लंभाते PI सतिष गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय २५ पोलीस कर्मचारी व २ आरसिपी पथक एवढा प्रचंड कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता अशी माहिती आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी दिली

error: Content is protected !!