ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

सफाई कामगारांच्या पाल्यांची मॅट्रिकपूर्व दरमहा शिष्यवृत्ती आता दुप्पट- धनंजय मुंडे

सफाई कामगारांच्या पाल्यांची मॅट्रिकपूर्व दरमहा शिष्यवृत्ती आता दुप्पट- धनंजय मुंडे

पहिली, दुसरी व तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार २२५० रुपये, एकरकमी रु. ७५० सह वर्षाला मिळणार ३००० रुपये शिष्यवृत्ती

मुंबई 2 —- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सफाई कामगार व आरोग्यास धोका असणाऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना ‘गुड न्युज’ दिली आहे. सरकारच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत आता बदल करण्यात आले असून विद्यार्थ्यांना दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती च्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे.

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या लाभात काही भरीव बदल करण्यात आले असून, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांना पूर्वी प्रतिमहिना ११० रुपये शिष्यवृत्ती मिळत असे ती वाढवुन आता प्रतिमहिना २२५ रुपये करण्यात आली आहे.

तिसरी ते दहावीतील विद्यार्थ्यांना महिना ११० रुपये मिळत असे, तेही वाढवून आता २२५ रुपये करण्यात आले आहे. तर वर्षाला मिळणारे एकत्रित मानधन हे पूर्वीप्रमाणे रुपये ७५० इतकेच असणार आहे. विद्यार्थ्यांना पूर्वी वर्षाला १८६० रुपये मिळत, नवीन नियमानुसार झालेल्या वाढीनंतर वर्षाला एकूण ३००० रुपये मिळणार असल्याचे ना. धनंजय मुंडे यांनी सांगितले.

वसतिगृहात राहणाऱ्या तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ७०० रुपये व वार्षिक अनुदान १००० रुपये या पूर्ववत नियमाप्रमाणेच सुरू राहील असेही या शासनानिर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील सफाईच्या क्षेत्रात व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या पाल्यांना या निर्णयामुळे दामदुप्पट लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही जात/धर्म याचे बंधन असणार नाही हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

error: Content is protected !!