ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

मध्यरेल्वेच्या प्लॅटफ्रॉम तिकिटाच्या दारात १० वरून ५० रुपये इतकी वाढ

राज्यात विशेष करून मुंबईत कोरोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आता प्लॅटफॉर्म तिकीट दरात पाच पट वाढ करण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म तिकिटासाठी आता १० रुपयांऐवजी थेट ५० रुपये मोजावे लागणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेशातील महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट दरात मध्य रेलवेने वाढ केली आहे. मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये केले आहे. काही निवडक स्टेशनवरील अनावश्यक गर्दी कमी करण्याच्या हेतूने मध्यरेल्वेने हा निर्णय घेतलेला आहे.

या संदर्भात बोलताना रेल्वे अधिकारी म्हणाले की, बाहेरगावी जाणारे प्रवाशी आणि त्यांचे नातलग रेल्वे स्थानकांवर गर्दी करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात करोना संसर्ग वाढला आहे. रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट दर ५० रुपयांपर्यंत वाढवला असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

गेल्या २४ फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. सुट्टीच्या हंगाम संपेपर्यंत म्हणजेच १५ जून २०२१ पर्यंत मध्य रेल्वेच्या महत्वाच्या स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीटाची दरवाढ लागू राहील, अशी माहिती त्यांनी दिली.

error: Content is protected !!