ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

हाळम ते गोंजेवाडी रस्त्यासाठी शेतकरी ग्रामस्थांचे तहसीलदार यांना निवेदन.

हाळम ते गोंजेवाडी रस्त्यासाठी शेतकरी ग्रामस्थांचे तहसीलदार यांना निवेदन.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️परळी | प्रतिनिधी.
तालुक्यातील हाळम येथील ग्रामस्थ शेतकऱ्यांनी हाळम ते गोंजेवाडी रस्त्यावर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी,पांदन रस्ता मोकळा करून देण्यासाठी येथील तहसीलदार सुरेश शेजुळ यांना आज दि.२ मार्च मंगळवार रोजी निवेदन दिले आहे.निवेदनावर सह्या करणाऱ्या ग्रामस्थ शेतकऱ्यांनी म्हटले आहे की आम्ही आमच्या शेतात पिढ्यानपिढ्या हाळम ते गोंजेवाडी या रस्त्याने जातोत,परंतु मागील काही वर्षांपासून सदरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून कांही-कांही ठिकाणी तर पाच फूट रुंद सुद्धा रस्ता राहिला नसल्याने आम्हाला शेतमाल आणणे व नेने तसेच इतर शेत कामांसाठी बैलगाडी,ट्रॅक्टर आम्हाला शेतकामासाठी शेतात नेता व आणता येत नसल्याने आम्हाला शेती करणेही मुश्कील झाले आहे.हाळम ते गोंजेवाडी या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने व रस्ताच राहिला नसल्याने गोंजेवाडी हे छोटेसे गाव देखील उठून गोंजेवाडीचे ग्रामस्थ दुसरीकडे स्थलांतरित झाले आहेत.मा. तहसीलदार यांनी सदरील रस्त्यावरील अतिक्रमण काढून देऊन रस्ता मोकळा करून द्यावा. अशी मागणी ही या निवेदनात शेतकरी,ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.या निवेदनावर संभाजी माधवराव गित्ते,गणेश गंगाधर गित्ते,शिवाजी माधराव गुट्टे,नाथराव मनाजी गुट्टे,आत्माराम रघुनाथ गुट्टे,  रामराव ज्ञानोबा गुट्टे, जगन्नाथ नामदेव गुट्टे,नाथराव मारुती दहिफळे,यांच्यासह अनेक शेतकरी ग्रामस्थांच्या सह्या आहेत. तहसीलदार यांना हे निवेदन देतेवेळी संभाजी गित्ते,भास्कर नामदेव गित्ते,गणेश गंगाधर गित्ते, प्रभाकर गुट्टे, दत्तात्रय दहिफळे, व्यंकट गोपाळ गुट्टे,प्रल्हाद मुंडे, पांडुरंग गुट्टे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

error: Content is protected !!