ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

टंचाईग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती न झालेल्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई, : सन 2017-18, 2018-19 मधील खरीप हंगामातील/दुष्काळग्रस्त भागातील इ.10वी व इ. 12 वीच्या परीक्षा शुल्कमाफीस पात्र तथापि अद्याप परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या/पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्यात आले आहे.

सन 2019-20 मधील अवेळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील इ.10 ची व इ. 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या कार्यवाहीसाठी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात आले आहे. तरी संबंधितांनी माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा.

याबाबतची तपशीलवार माहिती मंडळाच्या http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर इ.10 वीसाठी ‘http://feerefund.mh-ssc.ac.in व इ.12 वी साठी ‘http://feerefund.mh-hsc.ac.in या लिंकवर प्रसिद्ध करण्यात आली आहे

error: Content is protected !!