ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

थोर महापुरुषांची विटंबना करणारे बीड तहसिल कार्यालयातील संबंधित कर्मचारी व अधिकारी यांना निलंबित करून गुन्हा नोंद करा-किसकिंदा पांचाळ.

थोर महापुरुषांची विटंबना करणारे बीड तहसिल कार्यालयातील संबंधित कर्मचारी व अधिकारी यांना निलंबित करून गुन्हा नोंद करा-किसकिंदा पांचाळ.

🔸अशोक काळकुटे | संपादक

जिल्‍हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन केली मागणी.

▪️बीड | प्रतिनिधी.
विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करणार सौ.किस्किंदाताई पांचाळ,बीड तहसिल कार्यालयातील एका बाथरुम मध्ये ज्याच्यात फुटलेले टायर व कागदी रद्दी आहे त्या बाथरुममध्ये लोक लघुशंका करतात त्या बाथरुममध्ये थोर महापुरुषांचे प्रतिमा आढळुन आल्याने त्याची रितसर तक्रार आम्ही मा.निवासी जिल्हाधिकारी संतोष राऊत बीड यांना निवेदन देण्यात आले त्याचे फोटो, व्हीडीओ क्लीप ही दिलेले असतांना बीड चे विद्यमान नायब तहसिलदार श्री.डोके साहेबांनी स्वत: त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोलावुन घेवुन महापुरुषांच्या प्रतिमा त्या जागेवरुन उचलुन दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात आल्या. तरी आमची मागणी आहे की, थोर महारुषांच्या प्रतिमा ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहु महाराज, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम, लाल बहाद्दुरशात्री, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या महापुरुषाांच्या प्रतिमांची विटंबना झालेली आहे. तरी सर्व महापुरुष भारतीयांचे श्रद्धास्थान असुन जर अशी अवस्था बीड तहसिल कार्यालयात होत असुन तरी पण तहसिलदार साहेब यांनी कसलाच आदर दाखविलेला नाही व हे प्रकरण दडपण्याचा प्रकार केला असुन आम्हाला त्यांनी सांगितले की, तुम्ही अगोदर तक्रार करा नंतर पंचनामा करु, नंतर बघु, पंचनाम्यासाठी मंडळ अधिकारी राख साहेब आले असता त्यांनी पंचनामा केला पण नावालाच पंचनामा करुन तहसिलदार यांनी आमच्यासमोर तोंडी आदेश दिले की अगोदर या लोकांची तक्रार घ्या नंतर पंचनामा करु. जर अशी भुमिका एक जबाबदार तहसिलदार म्हणुन असलेल्या व्यक्तीने घेवुन थोर महापुरुषाबद्दल असा आदर करत असेल तर काय होईल ?
तरी मा.साहेबांना विनंती की, सद्या कार्यरत असलेले बीड चे तहसिलदार साहेब यांना तात्काळ निलंबीत करुन त्यांच्यावर महापुरुषांच्या विटंबना केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा. अशा प्रकारे झालेला महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही नसता आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची मा.साहेबांनी नोंद घ्या,असा इशारा
विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्थापक-अध्यक्ष किस्किंदा ताई पांचाळ,सविता जैन, सुनंदाताई मुळे, वशिष्ठ साबळे, दत्ता भाई प्रभाळे, आदींनी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

error: Content is protected !!