ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

कोरोनाचा दुसरा डोस घेतला आणि काही क्षणातच लस घेऊन मृत्यू झाला

भिवंडी : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात लस घेतल्यानंतर सुद्धा अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे तसेच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर लसीकरण केंद्रावर कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर धक्कादायक प्रकार घडला आहे.

कोरोना लसीकरण केंद्रात एका व्यक्तीने कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भिवंडी शहराच्या मनपा हद्दीत घडली आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील भाग्यनगर कामतघर इथे हा प्रकार घडला. ४१ वर्षांच्या सुखदेव महिपती किर्दत यांचा मृत्यू झाला आहे. सुखदेव यांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्यांना चक्कर आली. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उपचारासाठी सुखदेव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सुखदेव यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पतीचा मृत्यू कशामुळे झाला याची चौकशी करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. शवविच्छेदनानंतरच नेमकं कारण समजू शकेल अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!