ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

शिवसेनेचा ‘वाघ’ काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकला, रामदास आठवले यांची टीका

नांदेड :राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने मिळून महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापन केले होते. मात्र या तीन पक्षाच्या सरकारवर विरोधकांनी अनेकवेळा बेछुड आरोप लगावले होते. त्या पाठोपाठ आता रिपाई नेते आणि केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे अलीकडच्या काळात मवाळ झाले आहेत. त्यांना आता मवाळ झाल्याशिवाय पर्याय नाही. शिवसेनेचा वाघ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकला आहे. असा टोला आठवले यांनी लगावला आहे. ते नांदेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

तसेच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत फार दिवस टिकणार नाही, म्हणून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत यावे असे देखील यावेळी आठवले यांनी बोलून दाखविले होते. राज्य सरकार तीन पक्षाचे आहे, सध्या दोन पक्षातील प्रकरण बाहेर आली आहेत. तिसऱ्या पक्षातील प्रकरण देखील लवकरच बाहेर येईल. असा दावा मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केला आहे.

error: Content is protected !!