ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

महागाई विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल ,गॅस दरवाढीने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. त्यात वाढत्या इंधन दरवाढीमुळं सामान्य माणसाचे घराचे बजेट बिघडले आहे. आज सामान्य नागरिक सरवाढीमुळे हवालदिल झाला आहे.

तसेच चढत्या महागाईत शिक्षण संस्थाकडून सक्तीने वसूल होणारी फीवाढ, वीजबिल वसुली या मुद्द्यावरून आघाडी सरकार आणि केंद्र सरकार विरोधात मोठे राज्यव्यापी आंदोलन उभे केले जाणार आहे असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल,असे सुद्धा त्यांनी बोलून दाखवले आहे. ते आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी संदीप कारंडे शिवसेना, भाजप प्रवक्ते रामदास कोळी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. माजी खासदार राजू शेट्टी यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, वैभव कांबळे, महिला बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील, राजेंद्र गड्यानवार, सागर संभुशेट्टे हे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!