ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

केंद्र सरकारच्या कुचकामी धोरणामुळे महागाई: कमल निंबाळकर

केंद्र सरकारच्या कुचकामी धोरणामुळे महागाई: कमल निंबाळकर

बीड/प्रतिनिधी: केंद्र सरकारचे योग्य नियोजन नसल्याने सतत इंधन दरवाढ होत असून त्यातून महागाईमध्ये भर पडत आहे. त्यामुळे सामान्यांचे जगणे कठीण झाले असून महागाई नियंत्रणात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कमल निंबाळकर यांनी मंगळवारी (दि.२) निषेध व्यक्त केला.
भाजप सरकारच्या काळात महागाईत मोठी वाढ झाली आहे. मोदी सरकारने सामान्यांना विकासाची स्वप्ने दाखवून पुन्हा सत्ता काबीज केली. मात्र, महागाई रोखण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही. सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीने सामान्यांचा जीव जेरीस आला आहे. त्यामुळे वाहने वापरावीत की नाही, असा प्रश्न आहे. केंद्र सरकारच्या कुचकामी धोरणामुळे ही स्थिती ओढावली असून जनता कदापि माफ करणार नाही, असा इशारा कमल निंबाळकर यांनी दिला. इंन दरवाढ मागे घेऊन जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी करावा व शेतमालाला अधिकाधिक भाव द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कमल निंबाळकर यांनी केली.

error: Content is protected !!