ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

भायखळ्याच्या वीर जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात प्राण्यांसाठी उभारण्यात येणार रुग्णालय

मुंबई : भायखळ्यातील वीर जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय लवकरच नव्या विदेशी पाहुण्यांचे आगमन होणार आहे. या नव्याने येणाऱ्या पाहुण्यांसाठी संग्रालयात प्राण्यांच्या देखभालीसाठी छोटेखानी प्राण्यांचे रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे.

येणाऱ्या काळात वन्यप्राण्यांची देखभाल आणि त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्यास तात्काळ उपचार सुरु करण्यात यावे यासाठी राणीच्या बागेत लवकरच सुसज्ज असे प्राण्यांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात शस्त्रक्रिया विभाग, उपचार कक्ष, क्ष-किरण विभाग, प्रयोगशाळा, पिंजरे अशा विविध सुविधा असणार आहेत.

सध्या राणीच्या बागेत सुसज्ज असे आधुनिकरणाचे काम मनपाकडून युद्ध पातळीवर सुरु आहे. तसेच देश-विदेशातील प्राणी राणीच्या बागेत दाखल होत आहे. मागच्या वर्षभरात वाघाची जोडी, तरस असे वन्य प्राणी दाखल झाले आहेत. या प्राण्यांच्या प्रकृतीची काळजी घेता यावी यासाठी उद्यानाच्या आवारातच रुग्णालय उभारण्याचा निर्णय बृहमुंबई महानगर पालिका प्रशासनाने घेतला आहे.

error: Content is protected !!