ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

संगणक परिचालकांची मागणी महाविकास आघाडी लवकरच पूर्ण करणार – हसन मुश्रीफ

संगणक परीचालकांची मागणी मागील १० वर्षांपासून प्रलंबित आहे. भाजपा सरकारने ही मागणी मान्य केली नाही. परंतु आम्ही मात्र संगणक परीचालकांची मागणी मान्य करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. तसेच त्यांनी सोबत भाजपला टोला देखील लगावला.

यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, जसे महसूलचे सेतू आहेत तसेच ग्रामपंचायतीचे सेतू काढावे व ग्रामपंचायतीतून मानधन द्यावे अशी कल्पना होती. आता या सगळ्यांना किमान वेतन मिळावं का ? तर ते मिळालेच पाहिजे. यासाठी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची देखील भेट घेणार आहे. कारण त्यांनी ही यंत्रणा बळकट करायचं ठरवलं आहे. त्यामुळे वित्त आयोगाचे पैसे कमी करून यांना कसे देता येतील यांना मानधन कसं देता येईल याबाबत चर्चा करून मागणी पूर्ण करणार आहोत.

तसेच होणाऱ्या अर्थ संकल्पात ही मागणी पूर्ण होऊ शकत नाही कारण यामध्ये केंद्र सरकारचा विषय आहे. आता आंदोलकांना काही करू नका त्यांच्यावर गुन्हे दाखल करु नका ही मुलं आपली आहेत अस पोलिसांना सांगितले आहे. १० वर्षापासून ही मागणी पूर्ण झाली नाही. भाजपचे सरकार सुद्धा करू शकले नाही पण महाविकास आघाडी सरकार ही मागणी पूर्ण करेल.

error: Content is protected !!