ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी – अतुल भातखळकर

राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेश सुरु झाले असून या अर्थसंकल्प अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी बाकावर बसलेल्या भाजपमध्ये शाब्दिक युद्ध झालेले पाहावयास मिळत आहे. त्यात आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबर केली आहे असे ट्विट त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना उद्धव ठाकरे यांना राज्यातील भाजपा नेत्यांसोबतच मोदी सरकारवरही निशाणा साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत “शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे” असा टोला लगावला.

यावर प्रतिरूवर देतंय भातखळकर यांनी ट्विट केले आहे की, “चीनसमोर पळ काढे” असे निलाजरे विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भारतीय सैनिकांचा अपमान केला. उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत. जवानांचा अपमान केल्या बद्दल मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी… जनता या ‘राहुल गांधीगिरी’चा समाचार घेईलच” असे त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!