ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

बाबरी मस्जिद प्रकरणात मुख्यत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर आघाडीच्या मित्रपक्षांची नाराजी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बाबरीमशिदी संदर्भात वक्तव्य करत “होय बाबरी आम्हीच पडली” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी यांनी नाराजी व्यक्त करत आघाडीतल्या मुस्लिम नेत्यांना टोला लगावला आहे.

आझमी म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिदीसंदर्भात केलेले वक्तव्य योग्य नव्हते. महाविकासआघाडी सरकारमधील मुस्लिम नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध करून राजीनामे द्यायला हवेत असे त्यांनीं बोलून दाखविले होते. ते आज मुंबईत पत्रकार माध्यमांशी बोलत होते. आझमीय यांच्या या विधानावरून आघाडीमध्ये बिघाडी होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.

आझमी यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे हे आता शिवसेनेचे नेते नाहीत, ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे. ही खूपच दुख:द घटना आहे. हे सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामने चालते. उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन केले तेव्हा या मुस्लीम नेत्यांना लाज वाटायला पाहिजे होती असे वक्तव्य करत संताप व्यक्त केला होता.

error: Content is protected !!