ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

…..अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस न घेण्याचे कारण आले समोर

मुंबई : सध्या संपूर्ण राज्यभरात कोरोना लसीकरण युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यात १ मार्च पासून ६५ वर्षांवरील व्यक्तींना तसेच गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लस टोचण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लस टोचून घेतली होती मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप लस का टोचून घेतली नाही असा प्रश्न उपस्थित होत होता.

आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. याबाबत सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री कोरोनाची लस न घेण्याबाबत म्हणाले की, अधिवेशन संपल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेण्यात येईल. हृदयावर शस्त्रक्रिया झाली असल्याकारणाने डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेईन, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान देशातील दोन राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. याठिकाणची स्थिती चिंताजनक असून महाराष्ट्रातील बुधवारचा कोरोना रुग्णांचा आकडा चिंतेत भर घालणारा आहे. बुधवारी महाराष्ट्रात ९८५५ तर केरळमध्ये २७०० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या पाहिल्यास ६० ते ७० टक्के रुग्ण केवळ या दोन राज्यांमधील आहेत.

error: Content is protected !!