ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली सही

मुंबई  :पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विरोधकांनी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यात विरोधकांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यवादात असलेल्या दबावामुळे मंत्री संजय राठोड यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

अनेक दिवस उलटूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे न पाठवल्याने विरोधकांकडून आघाडी सरकारला घेरण्यात येत होते. राठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता आहे का? राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का? असा खोचक सवाल भाजपाने केला होता त्यात मुख्यमंत्र्यांनी तब्बल तीन दिवसांनी राजीनाम्यावर सही करून राज्यपालांकडे पाठवला होता.

मात्र आता या राजीनाम्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सही केल्याची माहिती खात्रीदायक सूत्राच्या माध्यमातून समोर येत आहे. त्यामुळे आता अधिकृतपणे संजय राठोड यांची मंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आलेली आहे. आता या जागेवर तीन पक्षाच्या कोणत्या नेत्याची वर्णी लागणार हे येणाऱ्या दिवसात दिसून येईल.

error: Content is protected !!