ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

कोरोना लस निवडण्याची नागरिकांना देण्यात यावी परवानगी, होत आहे आता सर्व स्तरातून मागणी

नवी दिल्ली : देशभरात लसीच्या दुसऱ्या टप्याला सुद्धा १ मार्च पासून सुरवात झालेली आहे. या दुसऱ्या टप्यात ६० वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असणाऱ्यांना लस टोचण्यात येत आहे. मात्र त्यांना लस निवडण्याची मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे काही केंद्रावर गर्दी आणि काही ठिकाणी कमी प्रतिसाद असेही चित्र दिसत आहे. नागरिकांना लस निवडीचे स्वातंत्र्य देण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सध्या भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्ॉक्सिन यादोन कंपनीच्या लशी दिल्या जात आहेत. यातील कोव्हिशिल्ड लसीने तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत, तर कोव्हॅक्सिनच्या अद्याप तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. लसीची परिणामकता आणि प्रभाव याबाबत अद्यापही साशंकता असल्याने कोव्ॉक्सिन घेण्यास नागरिक फारसे उत्सुक नाहीत.

तर लसीच्या नोंदणीसाठी उपलब्ध केलेल्या संकेतस्थळावर कोव्हिशिल्ड किंवा कोव्ॉक्सिन यापैकी कोणती लस घ्यायची आहे, हे निवडण्याचा पर्याय दिलेला नाही. केंद्रावर जी लस उपलब्ध असेल ती घ्यावी लागेल असे केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.

राज्यात कोव्हिशिल्डच्या तुलनेत कोव्ॉक्सिन लसीची केंद्रे कमी आहेत. ही लस घेणाऱ्यांची संख्याही दरदिवशी होणाऱ्या लसीकरणाच्या जवळपास दोन ते तीन टक्के आहे. राज्यात गुरुवारी ५१ हजार २४० नागरिकांचे लसीकरण झाले. यात ५० हजार २६३ जणांनी कोव्हिशिल्ड तर केवळ ९७७ जणांनी कोव्ॉक्सिन घेतल्याची नोंद आहे.

error: Content is protected !!