ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

‘श्रीराम बोले मैं कहाँ बडा, मैं तो बीजेपी के मेनिफेस्टो मे पडा, काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने उडवली खिल्ली

सध्या संपूर्ण देशभरात राम मंदिर उभारणीसाठी निधी गोळा केला जात आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मात्र अभाजपाच्या या अभियानावर काँग्रेससह विरोधी पक्षाने जोरदार टीका केली आहे.

मुंबईत पार पडणाऱ्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपावर निशाणा साधला होता. त्यानंतर गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजप वर टीका केली. आता युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी एक व्हिडीओ शेअर करत भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

या व्हिडीओमध्ये भाजपाविरोधी असलेल्या एका पक्षाचा नेता भाजपाच्या ठायी श्रीराम काय आहेत? हे समजावताना दिसून आला आहे. हिंदी भाषेतील या व्हिडीओमध्ये देवतांची एक गोष्ट सदर व्यक्ती सांगताना दिसून येत आहेत. त्या गोष्टीत सर्व देवांमध्ये कोण श्रेष्ठ हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु असतो. त्यावेळी सर्वजण आधी गंगा नदीकडे जातात. त्यानंतर महादेवाकडे जातात. पुढे सर्वजण पर्वताकडे जातात.

पर्वतापासून पुन्हा सर्वजण हनुमानाकडे जातात आणि शेवटी सर्वजण श्रीरामाकडे येतात. तेव्हा श्रीराम त्यांना सांगतात मी तर भाजपाच्या जाहीरनाम्यात पडून असतो. त्यामुळे मी कसा काय मोठा? जेव्हा निवडणूक आली तेव्हा मला बाहेर काढलं जाते आणि निवडणूक संपली की पुन्हा मी आहे तिथे, अशा शब्दात हे नेते भाजपाची खिल्ली उडवत आहेत.

error: Content is protected !!