ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

ठाण्यात घरात घुसून भाजपा नगरसेवकाने केला महिलेचा विनयभंग

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना एका महिलेच्या तक्रारीवरून अटक करण्यात आलेली आहे. अटक महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे. तेलवणे यांच्यावर एका महिला नगरसेविकेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती गुरुवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

काल रात्री जवळपास १२ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास मुरबाडचे नगरसेवक नितीन तेलवणे यांनी घरात घुसून नगरसेवक असलेल्या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती देशमुख यांनी दिली. याप्रकरणी तेलवणे यांच्यावर विविध कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

एकीकडे राज्यात धनंजय मुंडे आणि काँग्रेस प्रवक्ते डॉ राजू वाघमारे यांचे बंधू सुनीत वाघमारे यांच्यावर आरोप लावण्यात आले होते. तर संजय राठोड यांना महिला प्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. आता घरात घुसून नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. नितीन तेलवणे हे मुरबाडचे नगरसेवक आहेत.

error: Content is protected !!