ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली कोरोनाची लस

मुंबई : राज्यात तिसऱ्या टप्यातील कोरोना लसीकरणाला सुरवात झालेली आहे. या टप्यात ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना तसेच गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लस टोचण्यात येत आहे. त्यात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहिल्या टप्यातील कोरोनाची लस टोचून घेतली आहे.

राज्यपालांनी आज सकाळी मुंबईतील जे जे शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोरोनाच्या कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर आदी उपस्थित होते.

दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरोनाची लस टोचून घेतली होती. तसेच आता पर्यंत मिळलेल्या माहितीनुसार देशभरात २५ लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी, ६.४४ लाख नागरिकांना सोमवारीच लस देण्यात आली आहे.

error: Content is protected !!