ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध – धनंजय मुंडे

धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध – धनंजय मुंडे

आदिवासी विकासच्या धर्तीवर ‘त्या’ १३ योजनांना भरीव निधी देणार – ना. मुंडेंची विधानपरिषदेत माहिती

मुंबई (दि. ०५) —- : धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या न्यायालयीन प्रक्रियेसह महाविकास आघाडीचे सरकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर आखलेल्या १३ विकास योजनांना भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना केले.

आ. शरद रणपिसे, आ. भाई जगताप, आ. जयंत आसगावकर, आ. महादेव जानकर, आ. गोपीचंद पडळकर आदींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वतीने ना. धनंजय मुंडे हे बोलत होते.

मागील सरकारच्या काळात धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेने दिलेला अहवाल न्यायालयात सादर करण्यास तत्कालीन सरकारने उशीर केला, तसेच २०१९ मध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन समाजाला विविध विकासाच्या १३ योजनांची घोषणा करून १ हजार कोटी रुपये देण्याचे घोषित केले, मात्र त्यातील एक रुपयाही प्रत्यक्षात दिला नाही; हे त्यावेळी सत्तेत असणाऱ्या आमदार महोदयांनी सुद्धा सभागृहात मान्य केले!

दरम्यान सन २०२०-२१ या कालावधीत धनगर समाजाच्या विकासासाठी घोषित करण्यात आलेला ५१ कोटी रुपये कोविडचे निर्बंध असताना देखील काही प्रमाणात वितरित करण्यात आलेला असून, येत्या काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

error: Content is protected !!