ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

बिहार पुन्हा हादरलं, अल्पवयीन मुलासमोरच आईवर केला नराधमांनी बलात्कार

बिहारच्या जुमईमध्ये एक धाकदायक घटना घडली आहे. चकाई पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. घरात शेजारी  राहणारे दोघेजण घुसले आणि महिलेच्या अल्पवयीन मुलासमोरच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला तसेच तिला मारहाण केली. सध्या त्या महिलेची प्रकृती नाजूक असून त्या सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महिलेन पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी रात्री ती घरात झोपली होती. सोबत लहान मुलगाही होता. त्याचवेळी शेजारील दोघे जण घरात घुसले. तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच तिच्या हातातून चांदीच्या बांगड्याही हिसकावून पळ काढला. याबाबत कुणाकडे वाच्यता केली तर, जीवे मारू अशी धमकीही दिली.

या प्रकरणानंतर महिला आपल्या मुलाला घेऊन चकाई पोलीस ठाण्यात गेली. तिथे तिने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांनी बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे.

तर महिलेने चकाई पोलीस ठाण्यात गैरवर्तन आणि मारहाण केल्याची तक्रार दिली, त्यानंतर तिने जुमई पोलिसांना दिलेल्या जबाबात सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. महिलेच्या जबाबाच्या आधारे पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या प्रकरणात दोषी आढळल्यास आरोपींना अटक करून तुरुंगात रवानगी करण्यात येईल.

error: Content is protected !!