ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

गणेशोत्सव मंडळांचे कोरोना काळातील समाजकार्य उल्लेखनीय – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, : राज्यातील गणेशोत्सव मंडळांनी तसेच मंडळांच्या हजारो कार्यकर्त्यांनी कोरोना काळात समाज हितेशी बनून उत्कृष्ट काम केल्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले तसेच गोरगरिबांचे जगणे सुकर झाले. कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. त्यामुळे गणेश मंडळांनी यापुढेही तन्मयतेने काम करावे व यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

गणेशोत्सवाचे विश्वव्यापी संघटन असलेल्या अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाच्या वतीने आज राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील ३० कोरोना योद्ध्यांचा राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, उपाध्यक्षा मुक्ता टिळक, आमदार आशिष शेलार आणि महासंघाचे राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, समाज आहे म्हणून आपण आहोत. समाजात आपण जे काही कार्य करतो ते समाजाच्या पाठबळावरच आपण समाजासाठी काम करणे गरजेचे आहे. परोपकारासाठीचे जीवन धन्य आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी गणेशोत्सव महासंघ, अहमदनगर जिल्हाप्रमुख दिलीप महादेव शिरसाट, गणेशोत्सव महासंघ सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख, संतोष दिनकर मोर्ये, गणेशोत्सव महासंघ सातारा जिल्हाप्रमुख विनायक जगन्नाथ शिंदे, अविनाश जाधव, अमोद कारंजे, संतोष सुकडे, शिरीष परब, श्रीनिकेतन खानविलकर, सुभाष पवार, शशीकांत तोरस्कर, नितीन खेडेकर, मधुरा श्रीकांत शेडगे, गणेश मोरे, सचिन चव्हाण, दिपक यादव, आत्माराम म्हात्रे, सुबोध नाईक, अक्षय अडिवरेकर, रविंद्र गावडे, अक्षय यादव, सुषमा बेर्डे, रत्नाकर वारधेकर, हरिचंद्र दामोदर अहिरे, गणेश चंद्रकांत गुरव, योग शिक्षक सुनिल कुलकर्णी, सुरेश सरनोबत, राजेंद्र झेंडे, सिताराम वाडेकर, रामनाथ केणी, विकास माने, हनुमंत सावंत व प्रविण आवारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

error: Content is protected !!