ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

सावरकर मुद्द्यावरून शिवसेनेचे मत म्हणजे आमचे मत नाही, नाना पटोले यांचे विधान

मुंबई : विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये दुमत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शिवसेनेने विनायक दामोदर सावरकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणी केल्याच्या एक दिवसानंतरच महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर भाष्य केले आहे.

शिवसेनेची भूमिका ही आमची भूमिका नाही असे ते म्हणाले, “सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराज यांना भारतरत्न बहाल करण्यात यावा. भारतरत्न प्रदान करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, राज्य सरकारची नाही.” असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. त्यामुळे सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावरून आक्रमक असलेली शिवसेना पटोले यांच्या टीकेला काय उत्तर देणार हे आता पाहावे लागणार आहे,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सभागृहात हिंदुत्वादाच्या मुद्द्यावर बुधवारी टोला लगावला होता. केंद्र सरकारने सावरकरांना भारतरत्न का दिला नाही. भाजपाने आपल्या पूर्वीच्या मित्रपक्षाला हिंदुत्व शिकवू नये.“सावरकरांना भारतरत्न मिळावे यासाठी केंद्राकडे दोनदा पत्र पाठविले होते. भारतरत्न कोणाला देतात? पंतप्रधान आणि समितीचा हा हक्क आहे,” असे ठाकरे म्हणाले होते.

error: Content is protected !!