ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

मुकेश अंबानी यांच्या प्रकारची केस तातडीने एनआयएकडे सुपूर्त करावी – देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणावरुन गंभीर आरोप केले असून देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास एनआयएकडे देण्याची मागणी केली आहे. तसेच फडणवीसांनी पोलीस अधिकारी सचिन वझे यांचा उल्लेख करत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत.

मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल मुंबई येथील परिसरातील घऱाजवळ स्फोटक साहित्याने भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. अंबानी यांच्या ‘अ‍ॅन्टिलिया’ निवास्थानाजवळ ही कार रोडवर उभी करण्यात आली होती. गाडीत जिलेटिन या स्फोटकांच्या सुट्ट्या कांड्या सापडल्या होत्या.

एक गाडी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडली. संशय निर्माण करणारा हा घटनाक्रम आहे. वाहन सापडल्यावर टेलीग्रामवर एक ग्रुप तयार झाला आणि त्यावर एक पत्र आले ‘जैश उल हिंद’ नावाने. एक क्रिप्टो करंसी अकाऊंट दिले होते. पण तसे कुठले खातेच नसल्याचे फडणवीसांनी खुलासा केला आहे.

या प्रकरणात फडणवीसांनी असे अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. ही एकच गाडी तिथे आली नव्हती, दोन गाड्या त्या ठिकाणी आल्या होत्या. एकाच मार्गाने या दोन्ही गाड्या आल्या असून ठाण्यातूनच आल्या आहेत. पोलीस अधिकारी सचिन वझे गाडी ओळखल्याबरोबर पहिल्यांदा पोहोचले. कोणीही पोहोचण्याआधी ते पोहोचले नंतर क्राइमचे, स्थानिक पोलीस ठाण्याचे आणि इतर लोक आले. नंतर सचिन वझे यांना तपास अधिकारी म्हणून नेमण्यात आले. तीन दिवसांपूर्वी एका एसीपीला तपास अधिकारी म्हणून नेमलं असून, सचिन वझेंना का काढले? हे समजले नाही असे अनेक प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केले आहे.

error: Content is protected !!