ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

३१ मार्चपर्यंत बीडमध्ये या गोष्टी राहणार बंद ; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय.

३१ मार्चपर्यंत बीडमध्ये या गोष्टी राहणार बंद ; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय.

🔸अशोक काळकुटे | संपादक

बीड जिल्ह्यातील रुग्णसंख्या शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचताच सतर्कतेचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आठवडी बाजार, खाजगी कोचिंग क्लासेस, यात्रा ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून शतकाच्या उंबरठ्यावर रुग्ण संख्या जाऊन पोहोचली आहे.
दरम्यान मृत्यु दरात देखील गेल्या काही दिवसात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या वाढत असलेल्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना या अधिक कडकपणे राबविल्या जाणार आहेत.
त्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता गृह विलगीकरणातील व्यक्तींच्या हातावर शिक्के मारण्यात येणार आहेत.
सार्वजनिक स्वरूपाचे मेळावे आणि संमेलने बंद करण्यात आले आहेत.
खाजगी कोचिंग क्लासेस , यात्रा , आठवडी बाजार हे ३१ मार्च पर्यंत बंद राहणार आहेत. शहरी भागात कंटेन्मेंट झोनचा निर्णय मुख्याधिकारी तर ग्रामीण भागात तालुका आरोग्य अधिकारी घेणार आहेत.

महाशिवरात्री महोत्सव देखील रद्द..

बीड जिल्ह्यातील परळी हे ज्योतिर्लिंग असल्याने या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. परळीच्या वैद्यनाथ देवस्थानाने या यात्रेची मोठी तयारी केली होती. मात्र या ठिकाणी होणारी गर्दी आणि कोरोनाचा वाढत असलेला संसर्ग पाहता परळी येथील महाशिवरात्री महोत्सव रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी घेतला आहे.

error: Content is protected !!