ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

शर्जील उस्मानीची हायकोर्टात धाव. एल्गार परिषदेतील वक्तव्य भोवले 

मुंबई :  पुण्यात पार पडलेल्या एल्गार परिषदेतील भाषणात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल पोलिसांनी अलिगढ विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शर्जील उस्मानी याच्याविरोधात FIR दाखल केल्यानंतर त्याविरोधात त्याने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

आपल्या विरोधात नोंदवण्यात आलेला FIR रद्द करावा किंवा याचिकेवरील अंतिम निर्णयापर्यंत एफआयआरच्या आधारे आपल्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यास मनाई करावी, अशी विनंती शर्जीलने आपल्या याचिकेतर्फे हायकोर्टात केली आहे.

शार्जीलने हिंदू समाजाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. आजचा हिंदू समाज सडलेला आहे,’ असे वक्तव्य शर्जीलने आपल्या भाषणात केल्याने भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदीप गावडे यांच्या तक्रारीवरून स्वारगेट पोलिसांनी २ फेब्रुवारी रोजी शर्जीलविरोधात FIR दाखल केला. त्याने भारतीय न्यायव्यवस्था व संसदेचा अनादर करणारीही वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. आक्षेपार्ह वक्तव्ये करून सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

error: Content is protected !!