ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

नागपूर शहरात आज आणि उद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिनी लॉकडाऊन जाहीर

नागपूर : संपूर्ण राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या चनतेत अधिक भर घालत आहे. त्यात महाराष्ट्राची दुसरी राजधानी समजल्याजाणाऱ्या नागपुरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरात सुद्धा वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभामीवर नियम अधिक कडक करण्यात आले आहे.

शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी नागपूर शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, मंगलकार्यालये, प्रतिष्ठाने, सिनेनागृहे, हॉटेल, रेस्टॉरंट, नाट्यगृहे आणि मॉलही बंद राहणार आहेत. प्रशासनाने त्याबाबतची माहिती नागरिकांना दिली आहे तसेच काय चालू राहणार आणि काय बंद याची माहिती प्रशासनाने कळविली आहे.

नागपुरात मागच्या २४ तासात १३९३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात आज आणि उद्या मिनी लॅाकडाऊन करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवस जिल्ह्या बंदी लागू करण्या आलेलीआहे. फक्त चिकन, मटन शॉप, भाजीपाला, दूध विक्रीसह अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तर, जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, मंगलकार्यालये, प्रतिष्ठाने, सिनेनागृहे, हॉटेल, रेस्टॉरंट, नाट्यगृहे, मॉल, – शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार बंद राहणार आहेत.

error: Content is protected !!