ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

राज्यात जानेवारीत तब्बल ९९७ बालकांचा मृत्यू, धाकदायक माहिती आली समोर

मुंबई : एकीकडे राज्य सरकार राज्यातील कुपोषणामुळे होत असलेल्या बालमृत्यूचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा करत असताना दुसरकीड़े मात्र धक्कादायक आकडे समोर आलेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारचे पितळ उघड पडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नवीन वर्षांमध्ये पहिल्या महिन्यात राज्यात ९९७ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण, अंगणवाड्यांतील रिक्त पदे आणि माता व बालकांमधील कुपोषणामुळे मुलांमध्ये वजन कमी असण्याचे अशी अनेक करणे बालमृत्यूला कारणीभूत ठरली आहे.

राज्य सरकारकडून कुपोषण आणि बालमृत्यूचा थेट संबंध नसल्याचाही दावा केला जातो. मात्र कुपोषित मुलांना विविध प्रकारचे आजार होऊन संसर्ग वाढल्यानंतर प्राण गमवावे लागतात, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. जानेवारी २०२१च्या मिळालेल्या माहितीनुसार १ महिन्यात ९९७ बालकांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. यामध्ये ० ते १ वर्ष वयोगटातील ७८९ आणि १ ते ५ वर्षे वयोगटातील २०८ बालकांचा समावेश आहे. जुलै २०२०च्या महिला व बाल विकास विभागाच्या कॅस अहवालानुसार राज्यात ४८,१५४ तीव्र कुपोषित आणि १,७०,१६९ मध्यम कुपोषित अशी एकूण २,१८,३२३ बालके कुपोषित असल्याचे दिसून आले आहे.

error: Content is protected !!