ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

सचिन वझे यांनी फेटाळले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लावलेले आरोप फेटाळले

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जी स्कॉर्पिओ कार स्फोटकांसह पार्क करण्यात आली होती, त्या कारच्या मालकाचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर येथे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकारावर संशय घेताना नेमण्यात आलेले सचिन वझे यांचे नाव घेऊन काही प्रश्न उपस्थित केले असून त्यावर वझे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन वझे यांची फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना माध्यमांवर प्रतिक्रिया देत असताना फडणवीस यांचे आरोप फेटाळत त्यांनी काही बाबींवर प्रकाश टाकला. मनसुख हिरेन प्रकरणाबाबात मला काहीच माहीत नाही. आता खबर मिळाल्यानंतर मी तिकडेच निघाल्याचे वझे म्हणाले.

यावर बोलताना वझे म्हणाले की, रात्री उशिरा एका पत्रकाराने फोन करून पोलीस तुमच्याकडे संशयित म्हणून पाहत असल्याचेही तक्रारीत म्हटले, असे माझ्या कानावर आले आहे, असे वझे यांनी सांगितले. तुमचे आणि हिरेन याचं याआधी अनेकदा बोलणे झाले असा दावा फडणवीस यांनी केला आहे, असे विचारले असता त्यांनी तसे बोलू देत. त्याबाबत तेच तुम्हाला सागू शकतील, असे उत्तर वझे यांनी दिले.

तसेच वझे सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचल्याचा फडणवीसांचा दावा फेटाळला आहे. माझे म्हणाले की, घटनास्थळी मी पहिला गेलो नाही. सर्वात आधी गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस, नंतर परिमंडळ दोनचे उपायुक्त आणि त्यांच्या पाठोपाठ क्राइम ब्रॅन्चची टीम तिथे पोहचली. मी त्यात होतो, असे वझे म्हणाले.

error: Content is protected !!