ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी, शहरातील रुग्णसंख्येत होत आहे घट

पुणे : राज्यात विशेष करून पुण्यात कोरोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या अडचणीत वाढ करताना दिसत आहे. त्यात काही दिवसांपूर्वी पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली होती. त्यामुळे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संसर्ग संदर्भातील निर्बंध अधिक कडक केले होते.

मात्र आता पुण्यातून एक दिलासादायक बातमी पुढे येत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात करोना रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे. नागरिकांनी अधिक खबरदारी घेतल्यास पुढील आठवड्यात आणखी कमी होऊन पुणेकरांवरील संभाव्य निर्बंध टाळण्यास मदत होणार आहे.

पुण्यात १८ ते २४ फेब्रुवारी या दरम्यान कोरोना रुग्णवाढीचा दर हा उच्चांकी ११.२ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता, रुग्णसंख्याही ३७७२ झाली. त्यानंतर २५ फेब्रुवारी ते ३ मार्च या आठवड्यात रुग्णवाढाचा दर १०. ३ टक्क्यांपर्यंत घटला आहे. हा कल कायम राहिल्यास संसर्ग घटल्याचा तो संकेत ठरेल. अन्यथा, १२ मार्च रोजी होणाऱ्या आढावा बैठकीत पुणेकरांवर कडक निर्बंध लागू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

करोनाचा संसर्ग तीन-चार आठवड्यांपासून वाढतो आहे. तो रोखण्यासाठी महापालिका प्रशासन पुरेशी खबरदारी घेत आहे. नागरिकांकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे, अन्यथा भविष्यात कडक निर्बंधाना सामोरे जावे लागू शकते. गंभीर रुग्णांवरील उपचारांना महापालिका प्राधान्य देत असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे असे ट्विट काही दिवसांपूर्वी पुण्याच्या आयुक्तांनी केले होते.

error: Content is protected !!